जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 2 मुलांच्या जन्मानंतर पत्नीनं केला स्वतःच्या लैंगिकतेबाबत धक्कादायक खुलासा, ऐकून हादरला पती पण...

2 मुलांच्या जन्मानंतर पत्नीनं केला स्वतःच्या लैंगिकतेबाबत धक्कादायक खुलासा, ऐकून हादरला पती पण...

2 मुलांच्या जन्मानंतर पत्नीनं केला स्वतःच्या लैंगिकतेबाबत धक्कादायक खुलासा, ऐकून हादरला पती पण...

2020 साली जपानमध्ये राहात असताना निकोलेटने आपल्या पतीला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य सांगितलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी: अनेकदा नातं तुटण्याच्या भीतीने कपल एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगत नाहीत (Husband and Wife Relation). यामुळे त्यांच्यात अनेकदा एकमेकांवरील विश्वास कमी होत जातो. मात्र, अनेकदा जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा लोकांच्या पायाखालची जमिनच सरकते. नुकतंच अमेरिकेतील एका महिलेनं आपल्या पतीला स्वतःबद्दलचं एक असं सत्य सांगितलं जे ऐकून त्याला धक्काच बसला. मात्र, पतीने तिला साथ दिली.

Shocking! मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला निघालेला; अंधारात खोल विहिरीत कोसळला

मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, निकोलेट पोपा आणि तिचा पती रायन यांच्या लग्नाला 6 वर्ष झाले आहेत. दोघंही अगदी आनंदात संसार करत होते. मात्र, 2020 साली जपानमध्ये राहात असताना निकोलेटने आपल्या पतीला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य सांगितलं (Woman Tells Husband that She is Lesbian). निकोलेटने वेबासाईटसोबत बोलताना म्हटलं की लॉकडाऊनच्या काळात ते दोघंही पूर्ण वेळ सोबत राहात असत. त्यामुळे एकमेकांसोबत बराच वेळ बोलणंही होत असे. अशात निकोलेटने रायनला आपलं सत्य सांगितलं. निकोलेटने आपल्या लैंगिकतेविषयी खुलासा करत सांगितलं, की ते लेसबियन महिला आहे. म्हणजेच तिला पुरुष नाही तर स्त्रिया आवडतात. लग्नानंतर सहा वर्षांनी आणि २ मुलं झाल्यानंतर हे सत्य ऐकून रायन काय प्रतिक्रिया देईल असा प्रश्न तिला पडला होता. तिला असं वाटलेलं की रायन तिच्यापासून वेगळा होईल. मात्र, असं काहीच झालं नाही. रायनने निकोलेटचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं, की त्याला याची काहीच अडचण नाही. हे सत्य ऐकूनही दोघं एकमेकांपासून वेगळे झाले नाहीत. आता ते दोघं मिळून मित्रांप्रमाणे राहात आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत.

‘या’ महिलेच्या डोळ्यांत आहे जादू; अद्भुत डोळे ओळखतात दहा कोटी रंग; कसे ते वाचा

रायनने सांगितलं, की सुरुवातीला त्याला संशय येत असे, मात्र स्वतः याबद्दल विचारून त्याला निकोलेटला नाराज करायचं नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा निकोलेटला स्वतः त्याच्यासोबत हे शेअर करावं वाटेल तेव्हा ती सांगेल. आता हे कपल आपल्या मुलांसोबत नॉर्थ कॅरोलाईन येथे राहातं. निकोलेटने आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलली आहे. आता ती टॉम बॉयप्रमाणे तयार होते. निकोलेटला आयुष्यभर भीती होती की ही बाब समोर आल्यावर लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतील मात्र कपलच्या कुटुंबीयांना त्यांना साथ दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात