मुंबई, 14 मार्च : शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जमिनीवर एका प्राण्याची दुसऱ्या प्राण्याने आणि आकाशातून जमिनीकडे झेपावत एका पक्ष्याने एखाद्या प्राण्याची केलेली शिकारही तुम्ही पाहिली असेल. पण हवेत उडता उडता एका पक्ष्याने दुसऱ्या पक्ष्याची केलेली शिकार तुम्ही कधी पाहिली आहे का? आकाशातील पक्ष्याच्या शिकारीचा असाच थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bird hunting bird in mid air). हिंस्र प्राण्यांप्रमाणे असेच काही पक्षीही खतरनाक आहे. अशाच एका खतरनाक पक्ष्याने हवेत उडत उडत दुसऱ्या पक्ष्याची शिकार केली आहे. हा पक्षी म्हणजे बहिरी ससाणा. खतरनाक शिकारी पक्षी म्हणून त्याला ओळखलं जातं. ससाण्याने हवेत उडणाऱ्या एका छोट्याशा पक्ष्याला आपलं भक्ष्य बनवलं आहे. त्याने ज्या पद्धतीने पक्ष्यावर हल्ला केला ते पाहूनच धडकी भरते. हे वाचा - बापरे! का कोण आहे? गवतासारखा दिसणारा विचित्र जीव; VIDEO पाहून सर्वजण हैराण व्हिडीओत पाहू शकता ससाणा आपले विशाल पंख पसरून उडत आहे. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे पक्षीही उडत आहेत. या पक्ष्यांवर ससाण्याची नजर आहे. त्यांची शिकार करण्याच्या तयारीत तो आहे. त्याने एक पक्षी हेरला आणि त्याचा पाठलाग केला. त्या पक्ष्याच्या जवळ जाताच त्याने त्याच्यावर हल्ला केला. अवघ्या काही वेळात त्याने त्याला आपल्या पायांमध्ये धरलं.
untold_nature नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ अविश्वसनीय असा असल्याची प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर एका युझरने हे एखाद्या व्हिडीओ गेमसारखं वाटत असल्याची कमेंट केली आहे.