मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हौस म्हणून महिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप

हौस म्हणून महिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप

जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यावर टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता.

जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यावर टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता.

जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यावर टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 09 डिसेंबर : अलीकडे शरीरावर टॅटू काढून घेण्याची फॅशन भरपूर आहे. अनेक जण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढून घेतात. काही जण आपल्या संपूर्ण शरीराला जणू नोटीस बोर्ड मानतात आणि अगदी डोक्यापासून पायापर्यंत काही ना काही गोंदवून घेतात. काही जण विश्वविक्रमासाठी, तर काही जण प्रसिद्ध सेलिब्रिटीची कॉपी करून टॅटू काढतात. आयर्लंडमधल्या एका महिलेच्या बाबतीतही हेच घडलं; मात्र तिने फक्त शरीरावरच नाही, तर डोळ्यांच्या बुबुळांमध्येही टॅटूचे रंग भरले आहेत. याचा परिणाम म्हणजे आता हळूहळू तिची दृष्टी नाहीशी होऊ लागली आहे. अनाया पीटरसन असं त्या महिलेचं नाव आहे.

मृत शरिराचं पोस्टमॉर्टम करताना, पोटातून बाहेर आला जिवंत साप आणि...

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 32 वर्षांची अनाया पीटरसन कायद्याची विद्यार्थिनी आणि पाच मुलांची आई आहे. ती अ‍ॅम्बर ल्यूक नावाच्या सोशल मीडिया अ‍ॅन्फ्लुअ‍ॅन्सरची खूप मोठी चाहती आहे. अ‍ॅम्बर तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटूसाठी खूप प्रसिद्ध आहे. अ‍ॅम्बर ल्यूकने डोळ्यांच्या पांढर्‍या भागावर म्हणजेच बुबुळांवर टॅटू काढला होता. तिचंच अनुकरण करून अनायानंही डोळ्यात टॅटू गोंदवण्याचा विचार केला. अनायाच्या सात वर्षांच्या मुलीनं दृष्टी जाण्याची शक्यता बोलूनही दाखवली होती; मात्र तिने मुलीचं ऐकलं नाही आणि 2020मध्ये डोळ्यात टॅटू काढला.

बुबुळावर काढला टॅटू

जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यावर टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. या सगळ्या गोष्टी माहीत असूनही तिनं पाच महिन्यानंतर डाव्या डोळ्यातही टॅटू गोंदवून घेतला. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि काही महिने कोणतीही अडचण आली नाही; पण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अ‍ॅक दिवस झोपेतून उठल्यानंतर तिचे डोळे मोठ्या प्रमाणात सुजले होते.

बापरे! यांना झालंय काय? हा व्हायरसचा परिणाम की आणखी काही? VIDEO पाहून तुम्हीही हादराल

दृष्टी जाण्याचा धोका

तिच्या डोळ्यांची सूज वाढत होती, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला तीन दिवस थेंबाद्वारे अँटीबायोटिक्स देण्यात आलं. यानंतर डोळ्यांची बायोप्सीही करण्यात आली. दृष्टी पूर्ववत व्हावी म्हणून डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. थोडी विश्रांती मिळाल्यावर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला; पण ती पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. डोळ्यांची जळजळ थांबली असली तरी टॅटूच्या रंगामुळे अनायाची दृष्टी हळूहळू कमी होत आहे. आता तिला काचबिंदू (ग्लुकोमा) होण्याची शक्यता आहे. यामुळे दृष्टी पूर्ण जाण्याचाही धोका आहे. दृष्टी कमी झाल्यामुळे आता अनायाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे.

First published:

Tags: Shocking news, Tattoo