मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मृत शरिराचं पोस्टमॉर्टम करताना, पोटातून बाहेर आला जिवंत साप आणि...

मृत शरिराचं पोस्टमॉर्टम करताना, पोटातून बाहेर आला जिवंत साप आणि...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

शवविच्छेदन गृहाबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतेच. लोक अशा ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. पण तिथे काम करणाऱ्या लोकांना कधी कधी असे काही अनुभव येतात, जे ऐकून सर्वसामान्य माणूस हादरून जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 08 डिसेंबर : सोशल मीडियावरुन विचित्र बातम्या नेहमीच समोर येत असतात. त्यांपैकी काही बातम्या या अशा असतात. ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. आपण सर्वसाधारणपणे हे ऐकलं आहे की, एखाद्या अजगराने एका माणसाला गिळलं किंवा हिंस्र प्राण्याने माणसाला गिळलं. पण एक असं विचित्र प्रकरण समोर आलं हे जे धक्कादायक आहे.

शवविच्छेदन गृहाबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतेच. लोक अशा ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. पण तिथे काम करणाऱ्या लोकांना कधी कधी असे काही अनुभव येतात, जे ऐकून सर्वसामान्य माणूस हादरून जातो. असेच एक विचित्र प्रकरण अमेरिकेतील मेरीलँडमधून समोर आले आहे.

इथे पोस्टमार्टम करताना मृतदेहाच्या आत जिवंत साप आढळला. ज्याला बघून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती जोरजोरात ओरडत तेथून पळून गेली.

हे ही पाहा : Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि...

नऊ वर्षांपासून शवविच्छेदन तंत्रज्ञ म्हणून काम करत असलेल्या 31 वर्षीय जेसिका लोगानने तिचा एक अनुभव सांगितला. जो आपल्याला वाचताना किंवा ऐकताना धक्कादायक वाटत आहे. मग विचार करा तिची काय परिस्थीती झाली असावी

जेसिकाने सांगितले की, तिला तिची नोकरी आवडते कारण यामध्ये "नेहमीच काहीतरी वेगळं असतं". तेव्हा तिचा भयानक व्हिडीओ मांडताना ती म्हणाली की, "मी एका मृताचं पोस्टमार्टम करत असताना मला आत साप दिसला, त्यानंतर मी ओरड तेथून पळाली आणि जो पर्यंत त्या सापाला तेथून कोणी बाहेर काढलं नाही, तो पर्यंत मी तेथे गेलीच नाही."

आता तुमच्या मनात प्रश्न असा उभा राहिला असेल की हे कसं शक्य आहे? साप खाल्यामुळे माणूस मेला का, की नक्की काय घडलं?

तर या घटनेबद्दल सांगताना महिला म्हणाली की या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरात हा साप घुसला आहे. जो जिवंत होता.

तिने स्पष्ट केले, "मृत व्यक्ती कोणत्या अवस्थेत सापडते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जर ते कोरडे आणि थंड असेल तर तेथे सहसा जास्त कीटक जमा होत नाही. परंतु जर मृत शरीर गरम आणि ओलसर असेल तर तेथे बरेच किडे जमा होतात, जे शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे असतात."

First published:

Tags: Shocking news, Snake, Social media, Top trending, Videos viral, Viral