सिंगापूर, 12 ऑगस्ट : अनेकदा असं होतं की आपल्याला वाटतं एक आणि असतं काहीतरी भलतंच. असंच एका महिलेसोबत घडलं. तिला तिच्या बेडरूममध्ये साप (Snake) असल्याची भीती वाटत होती. पण जेव्हा बेडरूममधील सत्य तिच्यासमोर आलं तेव्हा तिला लाज वाटली (Snake video).
सिंगापूरमधील ही घटना आहे. इथल्या एका महिलेला आपल्या बेडरूममध्ये साप (Snake in bedroom) असल्याचं वाटलं. तिच्या बेडरूममधून साप फुत्करत असल्यासारखा आवाज येत होता. आवाज ऐकून ती घाबरली. तिच्या हातापायांना घाम फुटला. तिने तात्काळ प्राणीमित्रांना फोन केला. पथक तिच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी तपासणी केली आणि भलतंच सापडलं.
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होते आहे. एका फेसबुक युझरने आपल्या फेसबुकवर ही बातमी पोस्ट केली आहे.
हे वाचा - VIDEO - तरुणीने दाखवला असा हिसका; ढोलेशोले दाखवणाऱ्या तरुणाची हवा टाईट
जिथून आवाज येत होता तिथं साप तर सापडला नाही पण एक टूथब्रख सापडला. इलेक्ट्रिक टूथब्रश होता. हा टूथब्रश बंद चालू करून पाहिला तर त्याच्यातूनच आवाज येत असल्याचं स्पष्ट झालं. या टूथब्रशमध्ये पाणी गेलं होतं, त्यामुळे त्याचा असा विचित्र आवाज येत होता. हा आवाज सापाच्या फुत्करण्यासारखाच होता. त्यामुळे महिलेचीही गफलत झाली.
हे वाचा - मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येत होता फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम
ज्याला आपण साप समजत होतो, तो टूथब्रश निघाला हे महिलेला समजता तिला लाज वाटली. असं लगेच पॅनिक होऊन प्राणीमित्रांना बोलावल्याने तिने माफी मागितली. तसंच आता आपली टूथब्रथ बदलण्याची वेळ आली आहे, हे तिला कळून चुकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Singapore, Snake, Viral news, World news