जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - तरुणीने दाखवला असा हिसका; ढोलेशोले दाखवणाऱ्या तरुणाची एका क्षणात हवा टाईट

VIDEO - तरुणीने दाखवला असा हिसका; ढोलेशोले दाखवणाऱ्या तरुणाची एका क्षणात हवा टाईट

बॉडीबिल्डर तरुणाला तरुणीने घडवली अद्दल

बॉडीबिल्डर तरुणाला तरुणीने घडवली अद्दल

आपली बॉडी दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तरुणीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑगस्ट : बहुतेक तरुण तरुणींना इम्प्रेस (Boy impress girl) करण्यासाठी आपली बॉडी (Body) दाखवतात, आपले ढोलेशोले दाखवतात. पण प्रत्येक वेळी त्यांची देहयष्टी पाहून तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होतीलच असं नाही. त्यामुळे तरुणांचा हा प्रयत्न फसूही शकतो. उलट त्यांना असं काही करणं चांगलंच महागात पडू शकतं. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. लिफ्टमध्ये एक तरुण तरुणींना आपली बॉडी दाखवून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो (Boy prank with girl). काही तरुणी त्याला घाबरतात पण एक तरुणी मात्र त्याला चांगलीच अद्दल घडवते. तरुणी असं काही करते की ढोलेशोले दाखवणाऱ्या या तरुणाची हवा टाईट होते.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता लिफ्टमध्ये तरुण उभा आहे. इतक्यात एक तरुणी येते. तरुण आरशात पाहात आपलं टी-शर्ट काढतो. तरुणाला असं काही करताना पाहून तरुणी शॉक होते. तो तरुण तिच्या जवळ जातो. तरुणी घाबरते, लिफ्टचा दरवाजा वाजवू लागते आणि मदत मागताना दिसते. तरुण तरुणींना हात लावत नाही किंवा दुसरं काहीच करत नाही. पण टी-शर्ट काढून तो तरुणींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तरुणाचं हे रूप पाहून तरुणीही घाबरतात. हे वाचा -  नवरदेव ठोंब्यासारखा बसून राहिला, अखेर पंडितनेच…; लग्नाचा VIDEO पाहून व्हाल शॉक दुसऱ्या तरुणीसोबतही हा तरुण असाच प्रँक करण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळी मात्र त्याचा डाव त्याच्यावरच उलटतो. ती तरुणी आपल्या हातातील टोपी काढते आणि डोक्यावर घालते. त्यानंतर आपल्या अंगावरील जॅकेट काढते. ते पाहताच तरुण घाबरतो. कारण ज्या तरुणीला तो घाबरवण्याच प्रयत्न करतो ती खरंतर पोलीस असते. आपली पोलीस वर्दी दाखवतात, तरुणाची घाबरगुंडी उडते. हे वाचा -  घटम्, वीणा, गिटारच्या सुरात ‘है अपना दिल तो आवारा’; ऐकतंच रहावंसं वाटेल हे गाणं jatt_planet  इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात