मराठी बातम्या /बातम्या /Viral /आई होण्यासाठी 9 महिन्यांच्या प्रेग्नंट मैत्रिणीचं फाडलं पोट; महिलेचं धक्कादायक कृत्य

आई होण्यासाठी 9 महिन्यांच्या प्रेग्नंट मैत्रिणीचं फाडलं पोट; महिलेचं धक्कादायक कृत्य

महिलेने चोरलं मैत्रिणीच्या पोटातील बाळ. (फोटो सौजन्य - Newsflash)

महिलेने चोरलं मैत्रिणीच्या पोटातील बाळ. (फोटो सौजन्य - Newsflash)

स्वतःचा गर्भपात झाल्यानंतर महिलेने मैत्रिणीच्या प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यात तिचं पोट फाडून तिचं बाळ चोरण्याचा प्रयत्न केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

ब्राझिलिया, 24 ऑगस्ट : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. पण काही महिला काही कारणामुळे आई होऊ शकत नाहीत. ज्या आई होण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. एक ना दोन शक्य ते सर्वकाही उपाय करतात. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एका महिलेने आई होण्यासाठी चक्क आपल्या प्रेग्नंट मैत्रिणीचंच पोट फाडलं आहे. ब्राझीलमधील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

24 वर्षांची फ्लाविआ गोडिन्हो आणि तिचा नवरा  वाल्डली 2019 साली त्यांचं लग्न झालं. त्यांच्या आयुष्यात आता आणखी एक नवा सदस्य येणार होता. फ्लाविआ-वाल्डली दोघंही आई-वडिल होणार होते. गोडिन्हो 36 आठड्यांची प्रेग्नंट होती.  दोघंही आपल्या बाळाच्या आगमनाच्या तयारीत होते, त्याची आतुरतेने वाट पाहत होते.

घरात नवा पाहुणा येणार म्हटल्यावर त्या कपलसह, कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनाही आनंद होतोच. फ्लाविआची शाळेतील मैत्रीण रोजलबा ग्रिम्म हिलाही आपली मैत्रीण प्रेग्नंट असल्याचं समजताच आनंद झाला. पण तिचा हा आनंद वेगळ्याच कारणासाठी होता.

हे वाचा - चमत्कार! मृत लेकीने ऐकली आईची आर्त हाक; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली चिमुकली

तिने फ्लाविआला बेबी शॉवरसाठी म्हणून बोलावलं. 27 ऑगस्ट 2020 रोजी हा बेबी शॉवरचा कार्यक्रम होता. फ्लाविआने आपल्याला नवऱ्याला याबाबत सांगितलं आणि ती रोजलबाच्या घरी गेली पण ती पुन्हा घरी परतीलच नाही. वाल्डलीने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर रोजलबाने आपण बेबी शॉवरचा प्रोग्राम रद्द केला आणि फ्लाविआ दुसऱ्या कुणासोबत तरी तिथून निघून गेली असं सांगितलं.

तपासात एका वेअरहाऊसमध्ये मोठ्या प्लॅस्टिक पिशवीत फ्लाविआचा मृतदेह सापडला. तिचं पोट फाडलेलं होतं आणि तिच्या पोटात बाळ नव्हतं. पोटातून बाळ काढलं होतं.

अखेर रोजलबाचा कांड समोर आलाच. रोजलबाचा काही कालावधीपूर्वी गर्भपात झाला होता. तिला मूल हवं होतं म्हणून तिने आपल्या मैत्रिणीचं पोट फाडलं आणि तिच्या गर्भातून बाळ काढून त्याला रुग्णालयात घेऊन गेली. तिथं हे बाळ आपलं असल्याचं तिनं सांगितलं. पण नर्सला तिच्यावर संशय आला आणि तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.

हे वाचा - OMG! जुळ्या भावांशी लग्न केलेल्या जुळ्या बहिणींच्या मुलांचा DNA एकच; पाहून सर्वजण चकीत

फ्लाविआला आपल्या मैत्रिणीच्या या खतरनाक प्लॅनबाबत काहीच माहिती नव्हती. हे मैत्रिणीचं प्रेम आहे असंच तिला वाटत होतं. पण रोजलबाची नजर खरंतर फ्लाविआच्या पोटातील बाळावर होती.  जन्माला न आलेलं बाळ चोरी करण्याचा प्रयत्न तिने केला.

First published:
top videos

    Tags: Brazil, Crime, Pregnancy, World news