जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चमत्कार! मृत लेकीने ऐकली आईची आर्त हाक; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली चिमुकली

चमत्कार! मृत लेकीने ऐकली आईची आर्त हाक; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली चिमुकली

मृत्यूच्या 12 तासांनंतरही चिमुकली जिवंत.

मृत्यूच्या 12 तासांनंतरही चिमुकली जिवंत.

मुलीवर अंत्यंसंस्कार केले जात होते तेव्हा ती अचानक उठून बसली आणि आईला हाक मारत रडू लागली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेक्सिको सिटी, 24 ऑगस्ट : आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की काहीतरी चमत्कार व्हावा आणि ती व्यक्ती पुन्हा जिवंत व्हावी, असं प्रत्येकाला वाटतं. मृतदेहाशेजारी राहून रडून त्या व्यक्तीला परत येण्याची आर्त हाक दिली जाते. आपल्या लेकीच्या मृत्यूनंतर तिला अशीच आर्त हाक दिली ती एका आईने आणि तिची साद ऐकून मृत मुलगीही जिवंत झाली. मेक्सिकोतील या प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. सॅन लुइस पोटोसील राहणारी 3 वर्षांची कॅमिलिया रोक्साना, जिच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले पण तिला वाचवता आलं नाही. उपचारावेळी तिचं हृदय बंद प़डलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आपल्या मुलीचा मृत्यू झाला, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. माझी मुलगी जिवंत आहे, तिचा मृत्यू झाला नाही, असं ती सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती. पण आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रत्येकाला धक्का बसतोच तसाच आईला बसला असावा म्हणून ती असं बोलत असेल, असं समजून सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नव्हे तर तिला तिच्या मृतदेहापासून दूर केलं. हे वाचा -  कसं शक्य आहे? स्वतःच्या अंत्यसंस्कारात आली आणि सर्वांसोबत गप्पा मारू लागली; पाहा मृत महिलेचा LIVE VIDEO अखेर मुलीवर अंत्यसंस्काराची वेळ आली. पण तरी आपली मुलगी जिवंत आहे, हा विश्वास तिच्या आईला होता. तिचं शवपेटीकडे लक्ष होतं. अचानक तिला शवपेटीच्या काचेवर धुक्यासारखं दिसलं. जो मुलीच्या श्वासामुळे असावं असं तिला वाटलं. तेव्हाही तिने सर्वांना याबाबत सांगितलं. पण तेव्हासुद्धा कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला भास झाला असावा असं सर्वांनी तिला सांगितलं. पण त्यानंतर तिच्या सासूला पण काही वेळाने कॅमिलियाचे डोळे हलताना दिसले. त्यानंतर शवपेटी उघडून तिची नस तपासण्यात आली. तेव्हा ती जिवंत असल्याचं समजलं. हे वाचा -  मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते?; नव्या निष्कर्षानं बदलणार संशोधनाची दिशा मिरर च्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी कॅमिलियाला एकदा नव्हे तर दोन वेळा मृत घोषित केलं आणि या दोन्ही वेळा ती जिवंत होती. मृत घोषित केल्यानंतर तब्बल 12 तासांनी मुलगी पुन्हा जिवंत झाली. डॉक्टरांकडून ही मोठी चूक तर झाली. पण मुलगी जिवंत असल्याचा एका आईचा विश्वास खरा ठरला आणि आईच्या आर्त हाकेला लेकीनेही साद दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mexico , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात