अबूधाबी, 19 जानेवारी : जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा
(Burj khalifa) ज्या इमारतीला फक्त पाहूनच धडकी भरते. काही उंचावर गेल्यावर तिथूनच खाली वाकून पाहिलं तरी हृदयाची धडधड वाढते. मग विचार करा, बुर्ज खलिफाच्या सर्वात उंच टोकावर जाऊन खाली पाहिलं तर काय होईल? बुर्ज खलिफाच्या उंच टोकावर उभ्या असलेल्या अशाच एका महिलेचा
(Woman on Burj khalifa top) व्हिडीओ
(Video viral) सोशल मीडियावर
(Social media) व्हायरल होतो आहे. या महिलेने दुसऱ्यांदा हे धाडस केलं आहे. यावेळी मात्र तिच्या बाजूने एक विमानही गेलं.
बुर्ज खलिफावर उभ्या असलेल्या महिलेचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ आहे. हातात बोर्ड घेऊन ही तरुणी उभी आहे. इतक्या उंचावर उभं राहिल्यानंतर काय अवस्था होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आपल्याला तर कल्पनेनेच घाम फुटतो. पण या महिलेच्या चेहऱ्यावर मात्र कोणतीच भीती दिसत नाही आहे. अगदी एखाद्या टेबलावर उभी असावी तशी ती हसत हसत या उंच इमारतीवर उभी राहिली आहे. इतकंच नव्हे तर तिच्या बाजूने एक विमानही जातं त्यावेळी मात्र काळजाचा ठोकाच चुकतो.
हे वाचा - Shocking video! कुत्राही असं काही करू शकतो; त्याचं खतरनाक रूप CCTV मध्ये कैद
निकोल स्मिथ-लुडविक (Nicole Smith-Ludvik) असं या महिलेचं नाव आहे. तिने अमीरातच्या केबिन क्रूचा ड्रेस घातला आहे. तिच्या हातातील बोर्डात सुरुवातीला मी अजून इथंच आहे, असं लिहिलेलं दिसतं. त्यानंतर आयकॉनिक अमीरात A380 ला जगातील सर्वात महान शोमध्ये उड्डाण करण्यात मदत करा, अशा आशयाचं बोर्ड आहेत.
त्यानंतर तिच्या जवळूनच A380 विमान उडताना दिसतं. हे विमान निकोलच्या खूप जवळ असल्यासारखं वाटतं. मात्र प्रत्यक्षात ते तिच्यापासून 0.5 मील दूर आणि बुर्ज खलिफाच्या वरच्या बाजूने होतं.
हे वाचा - मृत्यू उभा होता समोर अन् हसत हसत महिला सेल्फी घेण्यात दंग; धक्कादायक Video
आता सर्वात महत्त्वाचा ही तरुणी इथं नेमकी उभी का राहिली आहे. तर हा व्हिडीओ म्हणजे यूएईतील एअरलाइन्स कंपनी अमीरात एअरलाइन्सची
(Emirates airline) जाहिरातीचा व्हिडीओ आहे. एअरलाइन कंपनीने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.