नवी दिल्ली, 19 जानेवारी : जेव्हा मृत्यू दारात उभा असेल तेव्हा आपली काय अवस्था होऊ शकेल याचा अदमास लावणं कठीण आहे. या क्षणी आपण आपला जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. काही जणांचं डोकं काम करेनासं होईल. मात्र याही पलीकडे कॅनडामध्ये एक महिलेने असं केली केलं की यावर आता चर्चा केली जात आहे. (Death was standing in front and smiling woman was taking selfie see what happened next in the viral video) अशा भीषण परिस्थितीतही महिला हसत हसत सेल्फी घेत असल्याचं दिसत आहे. तिच्या आजूबाजूला लोकांची गर्दी होती. ते तिचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करीत होते. बचाव कार्य करणारी टीमदेखील तिच्या मदतीसाठी पुढे गेली होती. ही घटना कॅनडा (Canada) येथील आहे. येथे एका महिलेची कार बर्फाच्या नदीत (Iced River) अडकली होती. आणि हळूहळू ती बर्फात रूतत जात होती. मात्र ही महिला कारच्या वर उभी राहून सेल्फी घेऊ लागली. यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर मदतीसाठी आलेल्या टीमने महिलेला बाहेर काढलं. मात्र या महिलेच्या चेहऱ्यावर मृत्यूची जराशीही भीती दिसत नव्हती. हे ही वाचा- रूममध्ये बसलेले लोक; अचानक पंखा खाली कोसळला अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO सोशल मीडियावर होतेय ट्रोल महिलेच्या कृत्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर महिला ट्रोल होत आहे. ही घटना कॅनडातील ओट्टावा (Ottawa) मधून वाहणाऱ्या रीडू नदीचा (Rideau River) आहे. सध्या कॅनडामध्ये थंडी वाढली आहे. याशिवाय बर्फाचा पाऊसही होत आहे.
#ottnews pic.twitter.com/Y1FmrpUX5m
— 580 CFRA (@CFRAOttawa) January 17, 2022
कॅनडातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी साधारण 4.30 वाजता घडली. ही कार हळूहळू बर्फात रूतत जात होती. महिला गाडी बाहेर पडली आणि कारच्या छतावर उभी राहून सेल्फी घेऊ लागली.
She captured the moment with a selfie while people hurried and worried to help her. 🤦🏼♀️ pic.twitter.com/ML6zWlSa9m
— Lynda Douglas Kurylowicz (@MammaMitch) January 17, 2022
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या वजनामुळे कार अधिक गतीने मागच्या बाजूला रूतू लागली.
Listener video of a water rescue on the Rideau River in Manotick #ottnews #TheMorningRush @billcarrolltalk pic.twitter.com/81CdtxFSYX
— 580 CFRA (@CFRAOttawa) January 17, 2022
यानंतर स्थानिकांनी बोटीतून जात महिलेच्या दिशेने रशी फेकली आणि तिला बाहेर काढलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांची खूप मदत झाली. ज्यामुळे महिलेला नदीबाहेर काढणं शक्य झालं.