मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीचे दागिने गायब, मेकअपही बिघडला; लग्नादिवशीच नवरदेवाने मग...; पाहा VIDEO

नवरीचे दागिने गायब, मेकअपही बिघडला; लग्नादिवशीच नवरदेवाने मग...; पाहा VIDEO

फोटो सौजन्य -  इन्स्टाग्राम (witty_wedding)

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम (witty_wedding)

नवरीने आपल्या लग्नाचा विचित्र किस्सा सांगितला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 11 ऑगस्ट : कितीही काळजी घेतली तरी लग्नात (Wedding) काही ना काही विघ्नं येतातच. अगदी परफेक्ट लग्न बहुधा होतच नाही. त्यामुळे लग्नातील (Wedding video) मजामस्ती, नवरा-नवरीमधील रोमँटिक क्षण याशिवाय विचित्र किस्सेही (Weird wedding incidents) असतात. अशाच एका लग्नातील किस्सा सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरीचे दागिने गायब झाले शिवाय तिचा मेकअपही बिघडला. त्यानंतर नवऱ्याची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी आहे.

आपण लग्नात परफेक्ट, सुंदर दिसावं यासाठी प्रत्येक नवरीचा प्रयत्न असतो. त्यामुळे लग्न ठरताच तिची शॉपिंग सुरू होतो. लग्नाचा ड्रेस, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मेकअप याकडे तिचं विशेष लक्ष असतं. पण नवरीसाठी खास असलेल्या या गोष्टीच विस्कटल्या तर. असंच काहीसं या नवरीसोबत झालं. जिने आपला विचित्र अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. त्याचवेळी ते दोघंही काहीतरी कुजबूजतही आहे. दोघंही आनंदात आहेत.पाहायला हा व्हिडीओ सुंदर, रोमँटिक वाटत असला तरी त्याची बॅकग्राऊंच स्टोरी फिल्मी आणि विचित्र आहे.

हे वाचा - नवरदेव ठोंब्यासारखा बसून राहिला, अखेर पंडितनेच...; लग्नाचा VIDEO पाहून व्हाल शॉक

पोस्टमध्ये नवरी सांगते, लग्नाच्या रात्री तिचे दागिने कुणा दुसऱ्यासोबत बदलले आणि तिचा मेकअपही बिघडला होता. इतकंच नव्हे तर धुकं असल्याने तिचं वेडिंग फोटोशूटही झालं नाही. नवरानवरीसोबत स्टेजवर असलेल्या कुणीतरी हा व्हिडीओ काढलेला आहे.

हे वाचा - VIDEO: फेरे घेतानाच लागत होती नवरीच्या लेहंग्याला आग; नवरदेवानं जे केलं ते...

नवरीसोबत इतकं घडलं तरी तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. त्यात लग्नात तिचा नवरा तिला एक गोड किसही देतो. ज्यामुळे ती लग्नातील आपला सर्व स्ट्रगल विसरते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. तिला ज्वेलरी, मेकअपची बिलकुल पडली नाही. नवराच तिच्यासाठी दागिना होतो. तोच तिचं सौंदर्य खुलवतो.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video