जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोफत जेवण मिळवण्यासाठी काहीही! तरुणीने चक्क साखरपुडा झाल्याचं केलं नाटक अन्...

मोफत जेवण मिळवण्यासाठी काहीही! तरुणीने चक्क साखरपुडा झाल्याचं केलं नाटक अन्...

मोफत जेवण मिळवण्यासाठी काहीही! तरुणीने चक्क साखरपुडा झाल्याचं केलं नाटक अन्...

महिलेनं सांगितलं की ती नुकतंच आपल्या मित्रांसोबत सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी वेनिस येथे गेली होती. तिथे तिने आपला साखरपुडा झाल्याचं नाटक केलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : अनेक लोक असे असतात ज्यांना मोफतच्या वस्तू (Free Things) मिळवण्यात विशेष रस असतो. मोफतच्या वस्तू मिळवण्यासाठी अनेकदा तर ते हेदेखील बघत नाहीत की आपण जो रस्ता निवडत आहे तो बरोबर आहे की चुकीचा. अनेकजण तर मोफतचं जेवण मिळवण्यासाठी अनोळखी लोकांच्या कार्यक्रमातही जातात. मात्र एका महिलेनं तर यासाठी हद्दच पार केली. मोफतचं जेवण आणि इतर सुविधांचा फायदा घेण्यासाठी तिने आपला साखरपुडा झाला असल्याचंच नाटक केलं. चोरी रोखण्यासाठी महिला चोरासोबत भिडली; भामट्याने हत्यार काढलं अन्.., Video डेली स्टार वेबसाईटच्या वृत्तानुसार, फ्रॅन स्टार्की नावाच्या महिलेनं टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करून आपला हा कारनामा सांगितला. हे ऐकूनच लोक थक्क झाले. franstarkey नावाच्या अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत महिलेनं सांगितलं की ती नुकतंच आपल्या मित्रांसोबत सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी वेनिस येथे गेली होती. तिथे तिने आपला साखरपुडा झाल्याचं नाटक केलं आणि मोफत अनेक गोष्टी मिळवल्या (Woman show Fake Engagement ring to get Discount). फ्रॅनने सांगितलं की तिने ईबे वेबसाईटच्या माध्यमातून अवघ्या 300 रुपयांची एक अंगठी मागवली आणि प्रवासात तिने सर्वांना सांगितलं की तिचा साखरपुडा झाला आहे आणि ती हाच आनंद साजरा करण्यासाठी आली आहे. या गुड न्यूजमुळे प्लेनमध्येही तिला फ्री ड्रिंक ऑफर झालं. याशिवाय वेनिसमध्ये हॉटेलमध्येही तिला फ्री ड्रिंक्स आणि स्नॅक्स मिळाले. ज्या रेस्टॉरंटमध्ये ती आपल्या मैत्रिणींसोबत जेवायला गेली तिथेही भरपूर डिस्काऊंट मिळाला. एका अनोळखी व्यक्तीने तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिला मोफत ड्रिंकही दिलं. यासोबतच वेनिसमध्ये नावेनं फिरताना अंगठी आणि साखरपुड्याच्या बातमीमुळे तिला याच्या भाड्यातही बरीच सूट मिळाली.

तब्येत बरी नसल्याने रुग्णलयात पोहोचली तरुणी; रिपोर्ट पाहताच सरकली पायाखालची जमीन

रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका महिलेनं यावर कमेंट करत लिहिलं, मला अनेकदा असं करायची इच्छा होते, मात्र माझा बॉयफ्रेंड नकार देतो. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, की ती आणि तिचा पती जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये थांबवण्यासाठी जातात तेव्हा सांगतात की त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यामुळे हॉटेलवाले लोक भाड्याच्या पैशातच त्यांची रूमही अपग्रेड करतात. पर्यटनस्थळी अनेकदा पर्यटकांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या खास दिवशी भरपूर डिस्काऊंट दिला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात