मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिलेनं अशा ठिकाणी केलं फोटोशूट ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही; थरकाप उडवणारा VIDEO

महिलेनं अशा ठिकाणी केलं फोटोशूट ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही; थरकाप उडवणारा VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला धबधब्याच्या अगदी टोकावर झोपलेली दिसते. कॅमेऱ्याचा अँगल बदलताच समोरच भीतीदायक दृश्य दिसतं.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला धबधब्याच्या अगदी टोकावर झोपलेली दिसते. कॅमेऱ्याचा अँगल बदलताच समोरच भीतीदायक दृश्य दिसतं.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला धबधब्याच्या अगदी टोकावर झोपलेली दिसते. कॅमेऱ्याचा अँगल बदलताच समोरच भीतीदायक दृश्य दिसतं.

नवी दिल्ली 02 फेब्रुवारी: काहीतरी वेगळा फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या नादात (Dangerous Selfie) अनेकदा लोक आपला जीव धोक्यात टाकतात. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात सेल्फी किंवा फोटोच्या नादात लोकांसोबत दुर्घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर काहीसा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात एक महिला धबधब्याच्या अगदी टोकाला बसून आपला व्हिडिओ शूट (Woman Shoot near Waterfall) करताना दिसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की इथे लहान चुकही झाली तरी महिलेचा जीव जावू शकतो. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील जाम्बियाचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ खरोखरच हैराण करणारा आहे.

कोब्राला पकडायला गेला; सापाने हल्ला करताच दिलं सोडून अन्..., धडकी भरवणारा VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला धबधब्याच्या अगदी टोकावर झोपलेली दिसते. कॅमेऱ्याचा अँगल बदलताच समोरच भीतीदायक दृश्य दिसतं. सहसा अशा ठिकाणी जायलाही लोक घाबरतात. यातील पाण्याचा वेग अतिशय अफाट असून पाणी शेकडो फूट खाली कोसळत आहे. नेमकं हे पाणी जिथून कोसळत आहे, त्याच कोपऱ्यावर महिला आरामात झोपली आहे. थोडाही तोल गेला तर यात तिचं वाचणं जवळपास अशक्यच आहे. मात्र, महिलेला याची जराही भीती वाटत असल्याचं दिसत नाही.

View this post on Instagram

A post shared by TYRESE (@tyrese)

हैराण करणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हॉलिवूड अभिनेता tyrese ने शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'हा सुंदर धबधबा दक्षिण आफ्रिकेच्या जाम्बिया येथे आहे. तुम्ही हा कधी अॅनिमल प्लॅनेट चॅनेलवर पाहिला आहे का? नसेलच पाहिला. कारण त्यांना वाटतं की अमेरिकेच्या लोकांनी असा विचार करावा की पूर्ण आफ्रिकेत जंगली गेमिंग लॉज, सिंह, वाघ रस्त्यावरच इकडे तिकडे धावतात.' काहीच तासापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 96 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे.

व्यक्तीने बॅग उलटी करताच बाहेर पडले शेकडो साप; VIDEO पाहून फुटेल घाम

व्हिडिओमध्ये महिला धबधब्याच्या अगदी टोकाला बसून शूट करत आहे, हे पाहून यूजर्स हैराण झाले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, लोक असल्या करामती करणं कधी बंद करतील माहिती नाही. छोटी चूक झाली तरी महिला शेकडो फूट खोल दरीत कोसळू शकते. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा वेडेपणा आहे. हे करून तुम्ही स्वतःचा जीवही धोक्यात टाकत आहात. आणखी एकाने लिहिलं, हे पाहून मलाच भीती वाटत आहे.

First published:

Tags: Photo viral, Selfie, Shocking news, Shocking video viral, Social media viral