नवी दिल्ली 02 फेब्रुवारी: सर्वात विषारी आणि धोकादायक समजला जाणारा कोब्रा साप आपल्या देशाच्या दक्षिणी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे इथल्या लोकांना अनेकदा या सापाचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावरही या घटनांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर येत राहतात. हे व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे (Shocking Video of King Cobra Attack).
भलामोठा दगड खाली कोसळला अन्...; गिर्यारोहकासोबत घडलेल्या घटनेचा Shocking Video
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये केरळचे प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेश दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते आपल्या हाताने कोब्रा साप पकडताना दिसतात. ते या सापाला एका पिशवीमध्ये पॅक करण्याचा प्रय़त्न करताना दिसतात. मात्र, साप संधी मिळताच त्यांच्या पायाला चावतो (Snake Bitten a Rescuer). यानंतर ते सापाला सोडून आपल्या पायाला पकडू लागतात.
Warning: Graphic content Kerala snake rescuer Vava Suresh gets bitten by a cobra during a rescue in Kottayam. Though he has been bitten by snakes many times in the past, this time he is said to be in an extremely critical condition. pic.twitter.com/VDklwTM2SK
— Bobins Abraham Vayalil (@BobinsAbraham) January 31, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी वावा सुरेश यांनी अनेकदा कोब्रा सापाला अगदी सहज पकडलं आहे. याशिवाय कित्येक वेळा त्यांनी स्थानिक लोकांनाही सापापासून वाचवलं आहे. सध्या कोब्राच्या विषाचा त्यांच्यावर अतिशय घातक परिणाम झाला आहे. सापाने चावा घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
बसचालकाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्याचा जीव घेतला, थरकाप उडविणारा VIDEO समोर
सहसा स्वप्नातही कोब्रा किंवा इतर कोणता विषारी साप दिसला की आपल्याला घाम फुटतो. मात्र, सर्पमित्र आपला जीव धोक्यात टाकून सापांना तसंच माणसांना सापापासून वाचवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत लोकांना असं करताना सावधान राहाण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Shocking video viral, Snake, Snake video