नवी दिल्ली 24 मे : घरात एकटं असताना विचित्र आवाज ऐकू येणं अनेक लोकांसाठी भितीदायक असू शकतं. पण कल्पना करा, तुम्ही नवीन घरात गेलात आणि एके दिवशी तुम्हाला भिंतीत माणसाची बोटं अडकलेली दिसली तर तुम्ही काय कराल? एवढंच नाही तर ती बोट हलताना दिसली आणि तो तुमची मदत मागू लागला तर तुम्ही नक्कीच जोरात ओरडाल. एका विचित्र घटनेत, दोन लोकांना पोलिसांना बोलवावं लागलं. जेव्हा त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या बाथरूमच्या दारातून कोणीतरी मदत मागताना दिसलं. आपण सर्वांनी कधी ना कधी अशा बातम्या वाचल्या आहेत आणि घराच्या भिंतींवर भयानक गोष्टी पाहून लोकांचे ओरडतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र, ही घटना तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. जॉनी नावाचा व्यक्ती अमेरिकेत शिफ्ट झाला. त्याला पहिल्यांदा त्याच्या फ्लॅटमधून विचित्र आवाज ऐकू आले. काही वेळातच त्याच्या जोडीदाराला काहीतरी आवाज ऐकू आले. TikTok वर शेअर केलेल्या छोट्या क्लिपमध्ये, जॉनी आणि त्याची पार्टनर बाथरूमच्या दिशेने चालत जाताना दिसतात आणि त्यांच्यापैकी एकाने शांतपणे दरवाजा उघडला. लूडो खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडले सासू-जावई; गावकऱ्यांना समजताच प्रेमकथेचा Shocking शेवट या जोडप्याला सुरुवातीला वाटलं की त्यांचा शेजारी काहीतरी मस्करी करत आहे. पण जेव्हा ते पूर्णपणे बाथरूममध्ये गेले तेव्हा त्यांना स्पष्ट आवाज ऐकू आला, ज्यामध्ये कोणीतरी त्यांची मदत मागितली आणि आपल्याला बाहेर काढण्यास सांगितलं. त्यांना बाथरूममध्ये टॉवेलच्या रॅकच्या अगदी वरच्या भिंतीला एक छिद्र दिसलं. त्यांच्यापैकी एकजण जवळ गेल्यावर त्या छिद्रातून एक बोट बाहेर येताना दिसलं. ही कथा अजून इथेच संपत नाही. बाहेर मोटारसायकलवर आणखी एक व्यक्ती बसलेली दिसली, तर भिंतीच्या मागे उभी असलेली व्यक्ती मदतीसाठी हाक मारत होती. UNILAD ने वृत्त दिलं, की कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की मोटरसायकलवरील पुरुष विगवाल्या एका महिलेसह अपार्टमेंटमधून निघून गेला. तेव्हा जॉनी आणि त्याच्या पार्टनरने पोलिसांना कॉल करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना जॉनीच्या घराशेजारील फ्लॅटमध्ये आठ लोक आढळले. वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हे अपहरणाचं प्रकरण मानलं. मात्र, मियामी पोलिसांच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने नंतर सांगितलं की एकाने नंतर कबूल केलं की ड्रग्सचे कॉकटेल घेतल्यानंतर त्याने खोटी कथा रचली. ज्यामुळे लोक गोंधळले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.