पाटणा 24 मे : अनेकदा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात विचित्र प्रेमाच्या कथा पाहायला आणि ऐकायला मिळतात. नुकतीच अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे, जी ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. बिहारमधील जमुईमध्ये एका व्यक्तीचं लुडो खेळताना आपल्याच सासूवर प्रेम जडलं. यानंतर गावातील लोकांनी आणि कुटुंबीयांनी दोघांचं प्रेमाचं भूत उतरवलं.
प्रेमकथेचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आता बिहारमधील जमुई येथील रहिवासी असलेला चंदन गोस्वामी आजकाल चांगलाच चर्चेत आला आहे. कारण तो चक्क आपल्याच सासूच्या प्रेमात पडला. आपल्या चुलत सासूला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचलेल्या जावयाला गावकऱ्यांनी पकडून बेदम मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं मिळालेल्या माहितीनुसार, चंदन गोस्वामी अनेकदा सासरच्या घरी जात असे. जिथे त्याची विधवा चुलत सासू त्याच्यासोबत लुडो खेळायची. लुडो खेळताना सासू आणि जावई कधी प्रेमात पडले हे कोणाला कळालंही नाही. लॉकडाऊनच्या काळापासूनच दोघांमध्ये अवैध संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, नुकतंच रात्री उशिरा सासूला भेटायला आलेल्या जावयाला गावकऱ्यांनी पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावई जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं सांगण्यात येत असून ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. त्याचवेळी, या व्यक्तीचं त्याच्या विधवा चुलत सासूशी अवैध संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे सासू-जावई यांच्यातील अशा विचित्र प्रेमामुळे परिसरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.