नवी दिल्ली 06 जुलै : एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं घर हे फार महत्त्वाचं असतं. भाड्याच्या घरात न राहता स्वतःच्या घरात राहण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यामुळेच प्रत्येक व्यक्ती पैशांची बचत करून स्वत:साठी घर घेण्याचा प्रयत्न करतो. पण घर खरेदीत तुमची सर्व बचत गुंतवल्यानंतर तुम्हाला तुमची फसवणूक झाली असल्याचं समजलं तर? असाच काहीसा प्रकार ज्युलिया हेन्निंग नावाच्या महिलेसोबत घडला. तिने आपली सगळी कमावू खर्च करून एक घर विकत घेतलं. मात्र, तीन वर्षांनी तिला या घराचं वास्तव कळलं. लाइफ कोच ज्युलिया कॅलिफोर्नियामध्ये राहाते. ती तीन वर्षे या घरात राहिली. पण आता तिला कळलं की तिच्या घरात एक गुप्त दरवाजा आहे, ज्याच्या आत एक खोली होती. साफसफाई करत असताना तिला घराच्या दाराला छिद्र दिसलं. यानंतर तिने हा दरवाजा तोडताच तिला धक्का बसला. मागच्या बाजूने पायऱ्या तळघरात जात होत्या. ज्युलिया पायऱ्यांवरून खाली आली तेव्हा तिला तिथे एक गुप्त खोली दिसली. तिला या खोलीबद्दल काहीच माहीत नव्हतं. Viral News - पाळीव श्वानाचं सतत मालकिणीच्या ब्रेस्टवरच लक्ष; सत्य समजताच महिला हादरली ज्युलियाला तिच्या घरात एक गुप्त जागा असल्याचं पाहून आश्चर्य वाटलं. दारावर दिसणाऱ्या छिद्रातून जेव्हा हे वास्तव बाहेर आलं, तेव्हा ज्युलियाने हे संपूर्ण प्रकरण आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. याचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. छिद्रामुळे तिच्या घरात लपलेली गुप्त खोली समोर आली. ही खोली तळघरात होती. ज्युलियाने त्या खोलीच्या भिंतीवर दोन नावं लिहिलेली पाहिली. जॉय आणि जॉन. यासोबतच तिथे एक चिन्ह देखील होतं, ज्याचा अर्थ ज्युलियाने तिच्या फॉलोअर्सला विचारला. ज्युलियाला या गुप्त खोलीत एक जार सापडला, ज्यात लहान मुलांच्या काही वस्तू होत्या. बाहेर आल्यानंतर ज्युलियाने घराच्या जुन्या मालकाला या खोलीबद्दल विचारलं. पण त्याच्या उत्तराने ज्युलियाचं समाधान झालं नाही. ज्युलियाला आठवलं की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा ती त्याच्याकडून घर विकत घेत होती, तेव्हा त्याने सांगितलं होतं की हे घर हळूहळू त्याचं रहस्य उघड करतं. यासोबतच अनेक रात्री त्याच्या घरातील घड्याळे अचानक तीन वाजता थांबत असत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी ज्युलियाला घर सोडून पळून जाण्याचा सल्ला दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.