मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे! हे काय? बॉससोबत Zoom meeting दरम्यान 'ते' दृश्य पाहून महिलेला वाटली लाज

अरे! हे काय? बॉससोबत Zoom meeting दरम्यान 'ते' दृश्य पाहून महिलेला वाटली लाज

त्यानंतर Turn on Now वर क्लिक करा. आता बॅटरी परसेंटेज सेट करा. त्यानंतर बॅटरी सेव्हर ऑप्शन अॅक्टिव्हेट करा.

त्यानंतर Turn on Now वर क्लिक करा. आता बॅटरी परसेंटेज सेट करा. त्यानंतर बॅटरी सेव्हर ऑप्शन अॅक्टिव्हेट करा.

बॉससोबत मीटिंग सुरू होताच महिलेला बॅकग्राऊंडमध्ये असं काही दिसलं की...

  • Published by:  Priya Lad

लंडन, 29 नोव्हेंबर : अद्यापही बहुतेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कायम ठेवलं आहे. त्यामुळे ऑनलाईन मीटिंग (Embarrassing Zoom Meetings) होतच असतात. ऑनलाईन मीटिंगचे (Online meeting) याआधी बरेच किस्से समोर आले आहेत. आता असाच आणखी एक किस्सा समोर आला आहे. एका महिलेने आपल्या बॉससोबतच्या ऑनलाईन मीटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे. बॉससोबत ऑनलाईन मीटिंग (Zoom Meeting with Boss) सुरू असताना तिला असं काही दिसलं की ती लाजेनं गुलाबी झाली.

यूकेच्या हॅक्नेमध्ये राहणारी 32 वर्षांची निकी फॉकनर (Nicki Faulkner) एचआर मॅनेजर आहे. आपल्या बॉससोबत झूम मीटिंगवर (Zoom Meeting with Boss) होती. अचानक तिचं लक्ष तिच्या बॅकग्राऊंडवर गेलं (Embarrassing background during zoom call). जे पाहताच तिला लाज वाटली (Woman Embarrassing moment on zoom call).

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार निकच्या मागे एक बाटली होती. जी ड्यूरेक्स मसाज ल्यूबची होती (Woman Left Durex Massage Lube in Background). सेक्सदरम्यान वापरला जाणारा हा एक जेल आहे.  निकीचं लक्ष तिथं गेलं.

हे वाचा - धक्कादायक! मोबाईल पाहून पाहून आता घरच्यांनाही ओळखेना; तरुणाची भयंकर अवस्था

निकीने सांगितलं वीकेंडला तिचा बॉयफ्रेंड तिच्या घरी राहायला आला होता. त्याने जाताना रूम नीट केली नाही. ती बेड बेडवर बसून काम करत होती. त्यामुळे मागे काय ठेवलं आहे हे तर बॉसला नक्कीच समजलं असेल. पण तिनं तिथून ते हटवलं नाही.

निकी म्हणाली, कदाचित माझ्या बॉसने ल्युब पाहिलं असावं. पण जर मी व्हिडीओ कॉलदरम्यान ते तिथून हटवलं असतं तर माझ्या बॉसचं लक्ष नक्कीच तिथं गेलं असतं. मग मला आणखीनच लाज वाटली असती.

हे वाचा - कॅफेचा विचित्र नियम! आईवडिलांना WELCOME पण मुलांना NO ENTRY

पुन्हा अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू नये, म्हणून निकीने आता बेडरूम सोडून किचनमध्ये मीटिंग करण्याचं ठरवलं आहे.

First published:

Tags: Lifestyle, Meeting, Online meetings