मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

धक्कादायक! मोबाईल पाहून पाहून आता घरच्यांनाही ओळखेना; Mobile addiction मुळे तरुणाची भयंकर अवस्था

धक्कादायक! मोबाईल पाहून पाहून आता घरच्यांनाही ओळखेना; Mobile addiction मुळे तरुणाची भयंकर अवस्था

आधी खाणं-पिणं-झोपणं विसरला आता कुटुंबालाही विसरला. मोबाईल व्यसनाचा तरुणावर भयंकर परिणाम.

आधी खाणं-पिणं-झोपणं विसरला आता कुटुंबालाही विसरला. मोबाईल व्यसनाचा तरुणावर भयंकर परिणाम.

आधी खाणं-पिणं-झोपणं विसरला आता कुटुंबालाही विसरला. मोबाईल व्यसनाचा तरुणावर भयंकर परिणाम.

  • Published by:  Priya Lad

जयपूर, 29 नोव्हेंबर : मोबाईलचे (Mobile) आरोग्यावर किती दुष्परिणाम (Mobile side effect on health)  होतात हे तुम्हाला माहिती आहेच (Mobile addiction). पण मोबाईल वापराचा एक असा भयंकर परिणाम समोर आला आहे  (Side effect of Mobile on health), जो कदाचित याधी तुम्ही कधीच ऐकला नसेल किंवा पाहिला नसेल. एका तरुणाला मोबाईलचं इतकं व्यसन जडलं की त्याची तहान-भूक आणि झोप तर उडालीच पण तो आता त्याच्या घरच्यांनाही ओळखत नाही आहे.

राजस्थानमधील ही धक्कादायक घटना आहे. मोबाईलच्या नादात 20 वर्षांचा अकरम सर्वकाही विसरला आहे. सुरुवातीला त्याने खाणं-पिणं सोडलं. तो झोपतही नव्हता. आता तर त्याची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याचा कुटुंबाटची चिंता वाढली आहे. तो आपल्या घरातील सदस्यांनाही विसरला आहे.

हे वाचा - Oh no! आइसक्रीम प्रँकमुळे चिमुकल्यांची सटकली आणि...; काय केलं पाहा VIDEO

हिंदुस्थान टाइम्सने आज तकच्या रिपोर्टचा हवाल देत दिलेल्या वृत्तानुसार अकरम पाच दिवस झोपला नाही आहे त्याच्या काकांनी सांगितलं की गेल्या महिनाभरापासून तो मोबाईलवर जास्त वेळ घालवू लागला. अनेकदा तर तो पूर्ण रात्र मोबाईलवरच असायचा.  मोबाईलचं त्याला इतकं व्यसन लागलं की त्याने खाणं-पिणंही सोडलं. जेव्हा आपण त्याला जेवण द्यायचो तेव्हा ते बेडवर टाकायचा असं त्याच्या आईने सांगितलं.

त्याला चुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मानसोपचारतज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहे. त्याचा सिटी स्कॅन करण्यात आला आहे, त्यानुसार उपचार होत आहेत.

हे वाचा - कधी चायनीज फायर थेरपीबद्दल ऐकलात का?, आजारपणात लावली जाते शरीराला आग

तुमच्या मुलांची परिस्थिती अशी होऊ नये म्हणून तुम्ही वेळीच सावध व्हा. एका  संशोधनानुसार, जे पालक मोबाईलवर सोशल मीडिया अपडेट, गेमिंगमध्ये जास्त गुंतलेले असतात, त्यांची मुलं अधिक गैरवर्तन करतात. म्हणूनच फोन सोडून मुलांसोबत चांगला वेळ घालवणे आणि त्यांच्याकडे शक्य तितके लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

घरी नियम बनवा

जेव्हा पालक अनेकदा फोनमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा हे पाहून मुलेही फोनवरच जास्त वेळ घालवतात. अशा परिस्थितीत यासाठी काही नियम बनवणे आवश्यक आहे, विशेषत: जेवण करताना जेवणाच्या टेबलावर कोणताही फोन किंवा टॅब येऊ नये इत्यादी.

सोशल मीडियाला नो म्हणा

तुम्ही सोशल मीडिया किंवा तुमचा फोन सतत तपासत राहिल्यास त्याचा तुमच्या मुलावर नकारात्मक परिणाम होईल. यासाठी सोशल मीडियापासून काही अंतर राखणं आवश्यक आहे.

सुट्टीच्या दिवशी फोनपासून दूर रहा

तुम्ही कुठेतरी फिरायला जात असाल तर फोटो जरूर घ्या, पण तो लगेच सोशल मीडियावर अपलोड करण्याऐवजी तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवा. यासाठी सुट्टीच्या काळात तुमचा फोन सायलेंट किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवावा, जेणेकरून तुम्ही फोटो क्लिक करू शकाल पण तो अपलोड करायचा नाही हे लक्षात राहील.

First published:

Tags: Health, Lifestyle, Mobile