मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कॅफेचा विचित्र नियम! आईवडिलांना WELCOME पण मुलांना NO ENTRY

कॅफेचा विचित्र नियम! आईवडिलांना WELCOME पण मुलांना NO ENTRY

ब्रिटनमधील एका कॅफेनं लहान मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची (Café owner bans children below five years but welcomes their parents) पाटी लावल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रिटनमधील एका कॅफेनं लहान मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची (Café owner bans children below five years but welcomes their parents) पाटी लावल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रिटनमधील एका कॅफेनं लहान मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची (Café owner bans children below five years but welcomes their parents) पाटी लावल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लंडन, 29 नोव्हेंबर: ब्रिटनमधील एका कॅफेनं लहान मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची (Café owner bans children below five years but welcomes their parents) पाटी लावल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कॅफेत पाच वर्षांखालील मुलांना प्रवेश करण्यास (No entry for kids) मनाई करण्यात आली आहे. पाच वर्षांवरील कुणीही या कॅफेत येऊ शकतं, मात्र त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर अनेक पालक नाराज असून आय़ुष्यात पुन्हा कधीही या हॉटेलात न येण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

असा आहे नियम

Harley’s Cafe and Coffee Bar या नावाच्या कॅफेमध्ये एक अजब नियम करण्यात आला आहे. या कॅफेत 5 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. वास्तविक, या ठिकाणी मिळणारे पदार्थ इतके चविष्ट आहेत की त्यासाठी लोकांची सतत गर्दी होत असते. मात्र लहान मुलांना कुठे ठेवायचं, असा प्रश्न असल्याने अनेकजणांना इच्छा असूनही या कॅफेत येता येत नाही. ज्यांना लहान मुलांना ठेवण्याची सोय आहे, केवळ अशाच व्यक्ती या कॅफेत येऊ शकतात.

हॉटेल आहे शानदार

टोनी आणि बॅवर्ले फ्लॅकेट या दोघांनी मिळून हा कॅफे सुरू केला आहे. त्याच्या डागडुजीसाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. इथं म्युझिक, स्पोर्ट्स आणि फिल्म्स यांच्याशी निगडीत अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. इथला ब्रेकफास्ट हा अनेकांना आवडत असल्यामुळे लोक इथं गर्दी करतात. इतर कॅफेच्या तुलनेत इथले दर काहीसे चढे असूनही केवळ इथल्या चवीखातर लोक पैसे खर्च करायला तयार असल्याचं दिसतं.

हे वाचा- विमानाच्या आत नाही तर बाहेर बसून अडीच तासांचा प्रवास; आता अशी झाली अवस्था

लहान मुलांना का नाही प्रवेश?

लहान मुलांना प्रवेश न देणारा हॅनले भागातील हा एकमेव कॅफे आहे. लहान मुलांचा दंगा नसल्यामुळे इथे शांतता मिळते, असं अनेकांचं म्हणणं आहे. केवळ या कारणासाठी अनेक नागरीक या कॅफेत येणं पसंत करतात. दुसरं म्हणजे इथल्या वस्तू आणि फर्निचर हे नाजूक आणि महाग आहे. लहान मुलांमुळे त्याचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आपण पहिल्यापासूनच लहान मुलांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला असल्याचं त्याच्या मालकांनी सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, Restaurant, Rules, School children