• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • टेबलावर 2 काचेच्या बाटल्या, त्यावर पाय ठेवून महिलेचा योगा; पुढे जे घडलं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका

टेबलावर 2 काचेच्या बाटल्या, त्यावर पाय ठेवून महिलेचा योगा; पुढे जे घडलं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका

विचित्र पद्धतीने योगा करणं महिलेला चांगलंच महागात पडलं.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : सध्या योगाला (Yoga) खूप महत्त्व दिलं जातं. अगदी सेलिब्रिटीही योग (Yoga video) करताना दिसतात. योगाचे काही प्रकार इतके कठीण असतात की हे नेमकं करतात तरी कसे, असा प्रश्न पाहताच क्षणी पडतो. सुरुवातीला सोपं मग हळूहळू करत योगाचे अवघड अशा पोझेसकडे आपण जातो. बरं काही जण अगदी वेगळ्या पद्धतीने योग करण्याचाही प्रयत्न करतात, असाच प्रयत्न एक तरुणी करत होती. तिने चक्क टेबलावर (Yoga on table) काचेच्या बाटल्या (Yoga on glass bottle) ठेवून त्यावर आपले दोन्ही पाय ठेवून योग करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social media viral video) होतो आहे. सामान्यपणे योग हा जमिनीवर केला जातो. पण या तरुणीने तो चक्क टेबलावर करण्याचा त्याही पुढे जाऊन दोन काचेच्या बाटल्यांवर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे काय घडतं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा. व्हिडीओत पाहू शकता, एक टेबल आहे. त्यावर तरुणीने दोन काचेच्या बाटल्या ठेवल्या आणि प्रत्येकी एका बाटलीवर एक असे दोन बाटल्यांवर दोन्ही पाय ठेवून ती राहिली. हे वाचा - अशी रडली नवरी की नवऱ्याची लुंगीही सुटली; पाठवणीचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO दोन बाटल्यांवर ती आपला तोल सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला ते काही शक्य झालं नाही. तिचा तोल ढासळतो. बाटल्या पडता आणि मग काय तीसुद्धा धडामकरून टेबलावरून खालीच कोसळते. व्हिडीओ पाहताच हसू येतं. पण त्याच वेळी काळजाचा ठोकाही चुकतो. कारण ती महिला इतक्या उंचावर हा स्टंट करत होती. त्यात काचेच्या बाटल्या. त्यामुळे तिला काही गंभीर दुखापत तर झाली नसेल ना, अशी चिंतासुद्धा वाटते. हे वाचा - OMG! फक्त हातांनीच उचलून बाजूला केली गाडी; रिअल बाहुबलीचा 'कार'नामा तर पाहा होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही महिला गॉडडेस योगा पोझ म्हणजे देवीसारखं बसण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. महिलेला असं काही करण्याची गरज काय? हा योगा आहे का? असे बरेच प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिवाय या महिलेला काही दुखापत तर झाली नाही ना, अशी विचारणाही करण्यात आली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: