Home /News /viral /

VIDEO - मगरीने केअरटेकरलाच पाण्यात फरफटत नेलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

VIDEO - मगरीने केअरटेकरलाच पाण्यात फरफटत नेलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

प्राणीसंग्रहालयात महिलेवर मगरीचा खतरनाक हल्ला.

    सॉल्ट लेक सिटी, 04 जानेवारी : आपल्याला क्वचितच दिसणारे असे जंगली, हिंस्र प्राणी प्राणीसंग्रहालयात पाहायला (Zoo) मिळतात (Animal video). इतक्या जवळून प्राण्यांना पाहताना त्यांच्या अधिक जाण्याचा मोहही होतोच. हे प्राणी पाळल्यासारखेच आहेत, त्यामुळे आपल्याला काही करणार नाहीत. यांच्यापासून आपल्याला धोका नाही, असंच अनेकांना वाटतं. त्यामुळे काही लोक अशा प्राण्यांच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका मगरीच्या (Crocodile) अगदी जवळ जाऊन तिला पाण्यात पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेसोबत जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल (Crocodile attack). मगरीने महिलेवर केलेल्या भयंकर हल्ल्याचा (Crocodile attack on woman). व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. मगरीने महिलेला पाण्यातच खेचून घेतलं. (Crocodile dragged woman into water) मगर एका काचेमध्ये बंदिस्त आहे. पण काचेचा दरवाजा एका बाजूने उघडा होताच ती पाण्यातून बाहेर डोकावते आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिथं असलेली हँडलर तिच्या जवळ जाते. अगदी तिच्या तोंडाजवळ आपला हात नेते, किंबहुना ती मगरीच्या तोंडातच हात टाकते. प्राणीसंग्रहायात असली म्हणून काय झालं, शेवटी ती मगरच. स्वभावानुसार तिने त्या महिलेचा हात आपल्या जबड्यात धरला आणि तिला पाण्यात खेचलं. महिलेने मगरीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण मगरीने तिला अधिकच घट्ट जखडून ठेवलं. महिला पाण्याच्या खाली आणि मगर तिच्यावर. हे वाचा - चक्क सिंहाला महिलेने कुशीत घेतलं आणि...; CCTV कॅमेऱ्यात कैद झालं Shocking दृश्य इतक्यात त्या महिलेला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका डेअरिंगबाज माणसाने पाण्यात उडी मारली. आपल्या जीवाची पर्वा न करता तो त्या मगरीशी भिडला. मगरीच्या पाठीवर बसला आणि तिच्या जबड्यातून महिलेचा हात खेचून काढण्याचा प्रयत्न केला. कसंबसं करून मगरीच्या तावडीतून त्याने महिलेची सुटका केली. महिला तिथून बाहेर पडली. त्यानंतर ती व्यक्तीसुद्धा बाहेर पडली. Life and nature (@afaf66551) नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - जेव्हा 2 क्रूर शिकारी मगर आणि शार्क आले आमने-सामने; पाहा पुढे काय घडलं, VIDEO याआधी सिडनी ग्लेन नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या फेसबुक पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार  उटाहच्या एका रेप्टाइल झूमधील ही घटना आहे. ज्या महिलेवर मगरीने हल्ला केला आहे, ती याच प्राणीसंग्रहायातील हँडलर आहे. तर महिलेला मगरीच्या तावडीतून सोडणारी व्यक्ती प्राणीसंग्रहायात फिरण्यासाठी आली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या