जकार्ता, 6 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवासी महिलेनं असं काही कृत्य केलं, की त्यामुळे अनेकजण तिच्याकडे वळून वळून पाहू लागले. हल्ली सोशल मीडियावर हिट्स मिळवण्यासाठी आणि प्रभावी ठरण्यासाठी लोक वाट्टेल ते करताना दिसतात. काहीजण अघोरी साहस करून लोकांचं लक्ष वेधून घेतात, तर काहीजण इतरांची फजिती करण्याचा मार्ग अवलंबतात आणि लक्षवेधी ठरण्याचा प्रयत्न करतात. त्यातील काहीजण तर जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंटही कऱण्याचा प्रयत्न करतात. मात्र इंडोनेशियात एका महिलेनं जे काही केलं, त्याचा तिला चांगलाच भुर्दंड सोसावा लागला. महिला झाली अर्धनग्न आपल्या सोशल मीडियावर हिट्स मिळवण्यासाठी माहिलेनं चक्क विमानतळावर अर्धनग्न होण्याचा निर्णय़ घेतला. सर्वांदेखत या महिलेनं तिचा टॉप उतरवला आणि शूटिंग केलं. तिचा हा अवतार पाहून आजूबाजूच्या प्रवाशांना धक्का बसला आणि प्रत्येकजण वळून वळून तिच्याकडे पाहू लागला. काही दिवसांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि पोलिसांनी महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. हे वाचा- सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, ओबीसींच्या आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती महिलेच्या नावे गुन्हा सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे आणि अर्धनग्न होऊन अश्लिलता पसरवणे हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी ताबडतोब या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारांमुळे नेटिझन्सही संतप्त झाले असून स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्यासाठी नागरिक वाट्टेल त्या थराला जात असल्याचा आरोप करत आहेत. अशा प्रकारे स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवण्याची गरज असून न्यायालयाने त्यांना कडक शिक्षा द्यावी आणि अशा वृत्तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत्, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.