जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आश्चर्य! गेली 15 वर्षे प्रेग्नंट आहे महिला, एक-दोन नव्हे तर तब्बल 12 मुलं; कारणही विचित्र

आश्चर्य! गेली 15 वर्षे प्रेग्नंट आहे महिला, एक-दोन नव्हे तर तब्बल 12 मुलं; कारणही विचित्र

सलग 15 वर्षे महिला प्रेग्नंट

सलग 15 वर्षे महिला प्रेग्नंट

सलग 15 वर्षे प्रेग्नन्सीचं महिलेने दिलं विचित्र कारण.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

एडिनबर्ग, 15 एप्रिल : सामान्यपणे प्रेग्नन्सी चा कालावधी 9 महिन्यांचा असतो. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एक महिला तब्बल 15 वर्षे प्रेग्नंट आहे. तिला तब्बल 12 मुलं आहे. महिलेच्या प्रेग्नन्सीने सर्वांनाच धक्का दिला आहे. असं एकही वर्ष नाही ज्यात ही महिला प्रेग्नंट राहिली नाही. महिलेच्या या शॉकिंग प्रेग्नन्सीचं कारणही तितकंच विचित्र आहे. आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा क्षण होतो. एका विशिष्ट वयात आई होण्याची इच्छा होते. या महिलेला ही आई व्हायचं होतं. ती प्रेग्नंटही राहिली. पण तिच्या प्रेग्नन्सीने सर्वांना शॉक केलं आहे. महिलेने स्वतःच आपल्या प्रेग्नन्सीची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जो सुलिवान असं या महिलेचं नाव आहे. ती स्कॉटलंडची राहणारी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

जो 44 वर्षांची आहे. 2004 साली ती पहिल्यांदा गरोदर झाली. तेव्हापासून तिचा प्रेग्नन्सीचा प्रवास सुरू झाला तो 15 वर्षे थांबलाच नाही. जो आणि तिचा नवरा बेन यांना आतापर्यंत एकूण 12 मुलं आहेत. या दाम्पत्याचं कुटुंब स्कॉटलंडमधील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे. बॉसने ऑफिसमध्ये वाटली मिठाई, खाताच कर्मचाऱ्याला धक्का; एका रात्रीत ती प्रेग्नंट जो आणि बेन त्यांच्या बारा मुलांसह चार बेडरूमच्या घरात राहतात. दोघंही सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असतात. आता या दाम्पत्याला इतकी मुलं आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या पालनपोषणासाठी भरपूर पैसा असावा असं वाटेल. पण तसं नाही. या दाम्पत्याने सांगितलं की त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण आहे. याशिवाय अनेक मुलांमुळे घरातील कामंही वाढतात. पण इतक्या मुलांना जन्म देण्याचं कारण म्हणजे फक्त जोची हौस. हॉस्पिटलऐवजी घरीच केली डिलीव्हरी; जन्माला आलं असं बाळ जे आजवर कधीच पाहिलं नाही जोला प्रेग्नंट होण्याची हौस आहे. तिला आपलं फुगलेलं पोट आवडतं. या विचित्र हौशेपोटीच ती गेली 15 वर्षे सतत गरोदर राहिली. एका बाळाला जन्म दिला की ती लगेच दुसऱ्या गर्भधारणेची तयारी करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात