मराठी बातम्या /बातम्या /Viral /हॉस्पिटलऐवजी घरीच केली डिलीव्हरी; जन्माला आलं असं बाळ जे आजवर कधीच पाहिलं नाही

हॉस्पिटलऐवजी घरीच केली डिलीव्हरी; जन्माला आलं असं बाळ जे आजवर कधीच पाहिलं नाही

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला पाहून सर्वजण थक्क झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 24 मार्च : बाळ आईच्या पोटात असताना ते कसं असेल, कुणासारखं दिसत असेल, याची उत्सुकता सर्वांना असते. बाळाचा जन्म होताच त्याला पाहण्यासाठी लोक आतूर असतात. असंच एक बाळ चर्चेत आलं आहे. याचं कारणही तसंच आहे. एका प्रेग्नंट महिलेने रुग्णालयाऐवजी घरीच डिलीव्हरी केली. त्यानंतर असं बाळ जन्माला आलं जिला पाहून ती थक्क झाली.

दोन मुलांची आई असलेली 36 वर्षांची रूश हार्वे जिने आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. हॉस्पिटलऐवजी तिची घरीच डिलीव्हरी करण्यात आली. 28 फेब्रुवारीला तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. पण हे बाळ सामान्य बाळांपेक्षा नव्हतं, खूप वेगळं होतं.  एकतर रूथची प्रसूती प्रसूतीच्या सामान्य कालावधीपेक्षा उशिराने झाली होती. त्यात बाळ असं की पाहून रूथसह तिची डिलीव्हरी करणारी महिला आणि तिचा नवराही हैराण झाला.

अग्गं बाई! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट; एकाच वेळी 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे PHOTO तुफान VIRAL

या मुलीचं नाव तबीथा ठेवण्यात आलं आहे. तबीथाला पाहून हैराण होण्याचं कारण म्हणजे तिचं वजन. सामान्यपणे बाळांचा वजन साडेतीन किलोपर्यंत असतं. पण तबीथा जन्मावेळी तब्बल 5 किलो 600 ग्रॅमची होती. तिला नवजात बाळांचे कपडे होतच नाही. 3-6 महिन्यांच्या मुलांच्या साइझचे कपडे घालावे लागतात.

आपल्या मुलीचं इतकं वजन पाहून रूथ हैराण झाली. तिने यूकेतील सर्वात वजनदार बाळाचे रेकॉर्ड तपासले. सर्वाधिक वजनाचं बाळ तिनं शोधलं. त्यावेळी 1992 साली जगातील सर्वाधिक वजनदार बाळ जन्माला आल्याचं तिला समजलं. त्याचं वजन जवळपास 7 किलो 30 ग्रॅम होतं. त्यानंतर 2013 साली एका बाळाचं वजन 7 किलो 2 ग्रॅम होतं.

आश्चर्य म्हणजे रूथची नॉर्मल डिलीव्हरी झाली आहे. जवळपास 8 तास प्रसूती वेदना सहन करून तिने या वजनदार बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच रूथची डिलीव्हरी करणाऱ्या मिडवाइफनेही आपण घरी जन्माला आलेलं असं बाळ कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं.

नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था

बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते दोघंही ठणठणीत आहेत.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Viral