जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - 20 रुपयांसाठी दिला लाखमोलाचा जीव; भरधाव ट्रेनसमोर तरुणाने आयुष्याचा केला The End

VIDEO - 20 रुपयांसाठी दिला लाखमोलाचा जीव; भरधाव ट्रेनसमोर तरुणाने आयुष्याचा केला The End

20 रुपयांमुळे आयुष्य संपवलं (फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

20 रुपयांमुळे आयुष्य संपवलं (फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

20 रुपयांसाठी मारहाण होताच व्यक्तीने ट्रेनसमोर उडी घेतली.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 15 डिसेंबर : कधी चालत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पडणं, रेल्वे रूळ ओलांडताना अचानक ट्रेन येणं असे एक ना दोन रेल्वे अपघाता चे कितीतरी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. असे व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. काही लोक तर ट्रेनसमोर उभं राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 20 रुपयांसाठी एका व्यक्तीने लाखमोलाचा जीव दिला आहे. रेल्वेसमोर उभं राहत या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेल्वे रूळांजवळ असलेल्या एका दुकानात माणसांची गर्दी दिसते आहे. अचानक या गर्दीतून एक व्यक्ती बाहेर पडते. व्यक्तीच्या अंगावर शर्ट नाही आहे. ही व्यक्ती धावत येते आणि रेल्वे रूळांवर हात पसरून उभी राहते. समोरून एक भरधाव ट्रेन येते आणि या व्यक्तीला उडवत धडधड करत निघून जाते. अंगावरून काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे. हे वाचा -  VIDEO - भरधाव ट्रकला ‘लटकला’ बाईकस्वार; ड्रायव्हिंग करताना फास लागला अन्… माहितीनुसार या व्यक्तीचा 20 रुपयांवरून वाद झाला होता. 20 रुपयांसाठी त्याला जमावाने मारहाण केली. त्यानंतर जसा त्याने ट्रेनचा आवाज ऐकला तसा तो लोकांच्या गर्दीतून धावत बाहेर आला आणि ट्रेनसमोर उभा राहिला. कुणाला काही कळायच्या आतच त्याचा जीव गेला. ट्रेन इतकी जवळ आली होती की कुणी त्याला वाचवण्यासाठीही पुढे धावलं नाही. तिथंच उभे राहून सर्वजण पाहत होते. null उत्तर प्रदेशच्या इटावाहमधील ही घटना आहे. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हे वाचा -  जमिनीवरून थेट हवेत, गरागरा फिरली अन्…; कार अपघाताचा थरारक VIDEO ट्विटर अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात