मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचली व्यक्ती; पण चपलेसाठी पुन्हा मागे जाताच...; LIVE VIDEO

रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचली व्यक्ती; पण चपलेसाठी पुन्हा मागे जाताच...; LIVE VIDEO

चपलेसाठी रेल्वे ट्रॅकवर जीव टाकला धोक्यात.

चपलेसाठी रेल्वे ट्रॅकवर जीव टाकला धोक्यात.

रेल्वे रूळ ओलांडण्याची या व्यक्तीने रिस्क घेतली आणि त्यानंतर ट्रॅकवर पडलेली चप्पल आणण्यासाठी पुन्हा मागे गेली आणि भयंकर घडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 16 नोव्हेंबर : एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं की लहान मुलं ती करतातच. खरंतर हे लहान मुलंच नव्हे तर प्रौढांच्या बाबतीही सारखंच आहे. जिथं धोका आहे, असं सांगितलं जातं तिथंच काही लोक मुद्दामहून जातात आणि आपला वारंवार आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल.

रेल्वे रूळ ओलांडू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. पण तरी काही लोक जिने, ब्रीज चढण्याचा त्रास नको म्हणून हाच शॉर्टकट निवडतात. अशाच एका व्यक्तीनेही रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. कशीबशी ती प्लॅटफॉर्मपर्यंत सुखरूप पोहोचली. पण तिची चप्पल रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली. ती चप्पल घेण्यासाठी म्हणून ती पुन्हा मागे गेली, तेव्हा मात्र भयंकर घडलं.

हे वाचा - VIDEO - त्या क्षणी RPF जवान तिथं नसता तर तिचं काय झालं असतं; 'ते' भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतो. एका मार्गावरून तो जातो. मध्ये लावलेली ग्रील ओलांडतो आणि दुसऱ्या मार्गावर जातो. त्याचवेळी समोरून ट्रेन येत असते. ती ट्रेन पाहतो आणि घाईघाईत पुढे जात असतो. इतक्यात त्याची चप्पल रेल्वे ट्रॅकवर अडकते.प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलेला तो ट्रेन येत असताना दिसूनही पुन्हा चप्पल घेण्यासाठी मागे जातो.

यानंतर अगदी आरामात ट्रॅकवरून चालतो. ट्रेन अगदी त्याच्याजवळ येते. त्यावेळी मात्र तो घाबरतो आणि प्लॅटफॉर्म चढण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने तो अगदी प्लॅटफॉर्मच्या जवळ असतो आणि तिथं ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये गॅप असते. त्यामुळे तो वाचतो. प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलीस आहेत. जे त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतात. व्यक्तीच्या या जीवघेण्या कृत्यामुळे ते इतके घाबरतात की त्या व्यक्तीला मारतात.

हे वाचा - Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद

ही घटना नेमकी कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. @Gulzar_sahab ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुमच्या चपलांपेक्षा जास्त किमती तुमचा जीव आहे. चपला काय बाजारात पुन्हा मिळतील पण तुमचं आयुष्य पुन्हा मिळणार नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

अवघ्या 22 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यावर बऱ्याच कमेंट येत नाही. नेटिझन्सी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्यक्तीने जे केलं त्यावर संताप व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Railway, Railway accident, Train, Train accident, Viral, Viral videos