वॉशिंग्टन, 04 जून : राग हा माणसांचा सर्वात मोठा शत्रू आहे, असं म्हटलं जातं. कारण रागात व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. काही जणांना आपल्या रागावर ताबा मिळवता येतो. तर काही जणांना आपल्या रागाला अजिबात आवर घालता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरूनही त्यांना खूप राग येतो आणि त्या रागात ते काहीही करतात. सध्या अशाच रागिष्ट महिलेची चर्चा सोशल मीडियावर आहे. जिला विमानात राग आला आणि तिने चक्क एअर हॉस्टेसचे (air hostess) दातच तोडले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
विमान प्रवासात प्रवाशांच्या मदतीसाठी, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी एअर हॉस्टेस असतात. साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या अशाच एका एअर हॉस्टेसनं एका महिला प्रवाशाला सीट बेल्ट बांधण्यास सांगितलं. पण या एअर हॉस्टेसची सूचना ऐकणं तर दूर उलट या प्रवाशाने त्या एअर हॉस्टेसवरच हल्ला केला.
Video obtained by CBS News shows the moment a Southwest Airlines flight attendant was punched by a passenger after asking her to keep her seat belt fastened during a flight from Sacramento to San Diego Sunday. https://t.co/gQusevodYC pic.twitter.com/oOYvPdwCFj
— CBS News (@CBSNews) May 27, 2021
सामान्यपणे विमान टेक ऑफ करताना किंवा लँड होताना सीट बेल्ट बांधणं हे प्रवाशांच्याच सुरक्षेसाठी असतं. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार साऊथवेस्ट एअरलाइन्सची फ्लाइड लँड होणार होतं. त्यावेळी सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्याची सूचना देण्यात आली.
हे वाचा - 25 वर्षाच्या हलिमानं एकसोबतच दिला 9 बाळांना जन्म, एका महिन्यानंतर आहे अशी अवस्था
28 वर्षांची महिला प्रवासी विवियाना क्विनोनेज (Vyvianna Quinonez) ने सीट बेल्ट बांधलं नव्हते. एअर हॉस्टेसने हे पाहताच तिने तिला सीट बेल्ट बांधायला सांगितलं. त्यावेळी महिला प्रवाशाला राग आला. फक्त राग आला नाही तर ती आऊट ऑफ कंट्रोल झाली. तिच्या सुरक्षेचा विचार करणाऱ्या एअर हॉस्टेसलाच तिने मुक्का मारला. तिच्या तोंडावर इतक्या जोरात फाइट मारली की तिचे दात तुटले आणि चेहऱ्यावरही जखम झाली आहे. सीबीएस न्यूजने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हे वाचा - चालकाशिवाय रिव्हर्स घेत योग्य ठिकाणी पार्क झाली रिक्षा; Tesla च्या कारशी तुलना
दरम्यान एअर हॉस्टेससोबत असं वागणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. विमान लँड होताच या महिलेला अटक करण्यात आली आहे. तसंच तिला आता विमान प्रवासावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Shocking viral video, Viral