मुंबई, 04 जून : ऑटोमॅटिक कारमध्ये (Automatic car) टेस्लाच्या (Tesla) कारचा (Tesla car) बोलबाला आहे. पण सध्या सोशल मीडियावर अशा रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याची तुलना चक्क या टेस्लाच्या कारशी केली जाते आहे. टेस्ला रिक्षा (Tesla auto) म्हणून या भारतातील जुन्या रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media viral video) खूपच चर्चेत आहे.
आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर एका अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ शेअर केला आहे.टेस्लाचा रिक्षा, ऑटोमेटिक पार्किंग सिस्टमसोबत असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या मजेशीर व्हिडीओला दिलं आहे.
#Tesla का रिक्शा, आटोमेटिक पार्किंग सिस्टम के साथ 😅😜
VC- SM. pic.twitter.com/XssVbOee8K — Dipanshu Kabra (@ipskabra) June 3, 2021
व्हिडीओत पाहू शकता, तुफान पाऊस कोसळतो आहे, त्यात एक गाडी चालकाशिवायच आपोआप मागे येते आणि योग्य ठिकाणी ती पार्क होते. पार्किंगमध्ये इतर गाड्याही उभ्या आहेत. त्यांच्या शेजारी एक गाडी पार्क होईल इतकी जागा आहे. पार्किंगमध्ये आधीपासून उभ्या असलेल्या एका गाडीला धक्का न लावता ही गाडी पार्किंगमध्ये उभी राहते.
हे वाचा - इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल
ही गाडी म्हणजे टमटम आहे. तीन चाकांवर असलेल्या आणि वरून फक्त कागदी शेड असलेली ही रिक्षा. पावसासोबत वाराही आहे आणि वाऱ्याचा वेग ज्या दिशेने आहे, त्या दिशेने ही रिक्षा जाते आहे आणि वाऱ्याच्या वेगाने ती एका कोपऱ्यात आपोआप पार्क होते. पण जणू काही एखाद्या ऑटोमॅटिक कारसारखीच ही रिक्षा असल्याचं वाटतं.
हे वाचा - हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO
हा व्हिडीओ पाहताच मजा म्हणून या रिक्षाशी ऑटोमॅटिक कारशी त्याची तुलना केली जाते आहे. अगदी टेस्लाच्या कारशी याची तुलना केली जाते आहे. या रिक्षाला चक्क टेस्ला रिक्षा असं म्हणण्यात आलं आहे. हा व्हिडीओ अनेकांनी लाइक केला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काय मग तुम्हाला आवडली का ही टेस्ला रिक्षा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Tesla, Viral, Viral videos