नवी दिल्ली 04 जून : मागील महिन्यात पश्चिम अफ्रिकेच्या मालीमधील एका महिलेची डिलीवरी जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. 25 वर्षाच्या हलिमा नावाच्या या महिलेनं एकसोबतच नऊ बाळांना जन्म दिला (Woman Gives Birth to Nine Babies) होता. डिलीवरीमध्ये अनेक अडचणी आल्यानं तिथल्या सरकारतर्फे महिलेच्या उपचारासाठी विशेष सोय करण्यात आली होती. जन्मानंतर बाळांची अवस्थाही नाजूक होती. अशात आता असं वृत्त समोर आलं आहे, की या सर्व बाळांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा झाली आहे. मात्र, अजूनही ही नऊ बाळं रुग्णालयातच भर्ती आहेत.
मोरक्कोमधील संबंधित रुग्णालयानं एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की 4 मे रोजी एका महिलेनं नऊ मुलांना जन्म दिला होता. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून त्यांना आणखी दोन महिने डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्याची गरज आहे. ऐन बोरजा क्लिनिकचे प्रवक्ता अब्देलकोद्दस हाफसी यांनी म्हटलं, की ही नऊ बाळं आता कोणत्याही मेडिकल उपकरणाच्या सहाय्याशिवाय श्वास घेत आहेत. श्वास घेण्यासाठी होणाऱ्या त्रासातून ते बाहेर आले आहेत.
बापरे! सनी लियोनीशी कोणी केली अशी मस्ती? पाहून तुम्हीही खळखळून हसाल
हाफसी यांनी सांगितलं, की या बाळांना ट्यूबच्या सहाय्यानं दूध दिलं जात आहे आणि आता त्यांचं वजनही वाढून 800 ग्रॅम आणि 1.4 किलोग्रॅमच्या दरम्यान झालं आहे. या नऊ बाळांमधील पाच मुली आणि चार मुलं आहेत. बाळांची आईदेखील त्यांच्यासोबतच आहे. हाफसी म्हणाले, की कोणत्याही मेडिकल सहाय्याशिवाय राहाण्यासाठी या मुलांना आणखी दीड महिन्याचा कालावधी लागेल. 10 डॉक्टर आणि 25 नर्सच्या टीमनं ऑपरेशनच्या माध्यमातून ही डिलीवरी केली होती.
माली सरकारनं 30 मार्च रोजी उत्तम देखभालीसाठी हलिमाला मोरक्को येथे पाठवलं होतं. सुरुवातीला अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये हलिमाच्या पोटात नऊ बाळं असल्याचं समोर आलं होतं. मात्र, डिलीवरीच्या वेळी डॉक्टरांना समजलं की ही सात नाही तर नऊ बाळं आहेत. याआधी अमेरिकेतील एका महिलेनं एकसोबतच आठ बाळांना जन्म देत विश्वविक्रम रचला होता. नद्या सुलेमान नावाच्या या महिलेनं 2009 साली वयाच्या 33 व्या वर्षी हा रेकॉर्ड बनवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.