मुंबई, 26 जानेवारी : हल्ली बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. पण काही वेळा ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंऐवजी दुसरंच काही तरी भलतंच मिळतं. अशी किती तरी प्रकरणं आहेत. असाच अनुभव नुकताच एका महिलेलाही आला. जिने ऑनलाईन सॅनिटरी पॅड ऑर्डर केलं पण तिला त्यासोबत आणखी एक अशी वस्तू मिळाली जी पाहून ती थक्क झाली. जसं तिने डिलीव्हरी मिळालेलं पार्सल खोललं तसं तिला झटकाच बसला.
ऑनलाईन सॅनिटरी पॅड मागवणाऱ्या या महिलेने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. समीरा असं या महिलेचं नाव आहे.
समीराने ट्वीट केलं आहे की, "मी स्विगी इन्स्टामार्टवरून सॅनिटरी पॅड्स मागवले होते आणि मला बॅगेच्या तळाला चॉकलेट कुकीजही सापडले. हे स्विगी की दुकानदाराने पाठवले मला नक्की माहिती नाही"
I ordered sanitary pads from @SwiggyInstamart and found a bunch of chocolate cookies at the bottom of the bag.
Pretty thoughtful! But not sure who did it, swiggy or the shopkeeper? — Sameera (@sameeracan) January 25, 2023
महिलेचं हे ट्विट पाहिल्यानंतर स्विगी इन्स्टामार्टने यावर रिप्लाय दिला आहे. स्विगी केअर्स ट्विटर अकाऊंटवर महिलेला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. समीरा आम्हाला तुझा दिवस आनंदात जावा असं वाटत होतं, असं स्विगीने म्हटलं आहे.
We just want you to have a pleasant day ahead, Sameera :)
^Ashwin — Swiggy Cares (@SwiggyCares) January 25, 2023
दरम्यान यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. जाहिरात म्हणून स्विगी आपल्या ग्राहकांना अशा मोफत वस्तू देतं, असं काही नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.
हे वाचा - चर्चा तर होणारच! कपलने केलं असं लग्न की शाही विवाह, डेस्टिनेशन वेडिंगही फेल; पाहा WEDDING PHOTO
ऑनलाईन शॉपिंगमध्ये तरुणाला जॅकपॉट
ऑनलाईन शॉपिंगमध्ये जसा सुखद धक्का या तरुणीला मिळाला तसाच एका तरुणालाही याआधी लागला होता. ऑनलाईन शॉपिंगमध्ये तर त्याला चक्क जॅकपॉटच लागला होता. फ्लिपकार्टवर सेल लागलेला असताना त्याने आयफोन 13 मागवला पण त्याला आयफोन 14 मिळाला. एका ट्विटर युझरने आपल्या एका फॉलोअरच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तसंच, पुराव्यादाखल काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते.
हे वाचा - ओ तेरी! चक्क चमच्याने हजामत; कधीच पाहिला नसेल असा Hair cut Video
तुमच्यासोबतही असं कधी काही घडलं आहे का? ऑनलाईन शॉपिंगचा तुमचा असा काही अनुभव, किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online shopping, Sanitary napkins, Sanitary pads, Viral