मुंबई, 25 जानेवारी : सामान्यपणे केस कापण्यासाठी कात्री, रेझर, वस्तरा यांचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी चमच्याने हेअर कट केला आहे का? काय चमच्याने कसा हा हेअर कट करता येईल. पण असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती एका मुलाची चक्क चमच्याने हजामत करताना दिसला. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
हेअरकट प्रमाणे हेअरकट करण्याचेही बरेच प्रकार आहेत. म्हणजे कात्रीशिवाय अगदी मोठा चाकू आणि आगीनेही हेअर कट केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. हा व्हिडीओ तर त्याच्याही पुढचा आहे. ज्यात चमच्याने हेअरकट करण्यात आला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मुलगा खुर्चीत बसला आणि त्याचे वडील त्याच्यामागे उभे आहेत. ज्यांनी हातात चमचा धरला आणि त्यानेच त्या मुलाचे केस कापत आहेत. चमच्याने केस कापले जात असल्याचंही दिसतं आहे. केस कापून त्याला आकारही दिला आहे, जो पाहिल्यानंतर या मुलाचे केस चमच्याने कापले आहेत, यावर विश्वासही बसणार नाही.
हे वाचा - मिशन Valentine's Day! GF साठी BF असं काही करतोय की VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क
ari_rover इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांच्या मते, हा चमचा वाईब्रेनियमने बनला आहे, तर काहींच्या मते चमच्यात ब्लेड आहे, काहींनी हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos