Home /News /coronavirus-latest-news /

VIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू

VIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू

Corona patient dance video: गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक 30 वर्षीय युवती ऑक्सिजन मास्क लावला असताना 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर थिरकत होती. दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 मे: मागील काही दिवसांपासून भारतात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान (Corona pandemic) घातलं आहे. देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण (Corona cases in india) आढळत आहेत. तर हजारो लोकांचा कोरोनामुळं मृत्यू (Corona patients death) होतं आहे. तर रुग्णालयात असंख्य कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूशी लढा देत आहेत. अशा एकंदरित नैराश्यपूर्ण वातावरणात जगण्याची उमेद दाखवणारा एक सकारात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाला होता. संबंधित व्हिडिओमध्ये एक 30 वर्षीय युवती ऑक्सिजन मास्क लावून मृत्यूशी झगडत (Corona patients dance) असताना 'लव्ह यू जिंदगी' (love you zindagi song) या गाण्यावर थिरकत होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. तर अनेकांनी तिच्या सकारत्मकतेचं भरभरून कौतुक केलं होतं. पण या तरुणीची कोरोनापुढं हार झाली आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात संबंधित कोरोनाबाधित तरुणीनं अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. आयुष्यावर इतकं प्रेम करणाऱ्या तरुणीची कोरोनापुढे हार झाल्यानं सोशल मीडियात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात डॉक्टर मोनिका लंगेह नावाच्या ट्विटर वापरकर्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संबंधित व्हिडिओ शेअर केला होता. डॉक्टर मोनिका यांच्या मते, संबंधित कोरोनाबाधित तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळू शकला नाही, म्हणून तिला कोविड इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिला NIV on Invasive Ventilation वर ठेवण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि प्लाझ्मा थेरपीदेखील देण्यात येत होती. हे ही वाचा-वाईटातून चांगलं घडल्याचा प्रकार! कोरोना झाल्यानं दोन माओवाद्यांनी केलं आत्मसमर्प यावेळी डॉक्टरांनी पुढं लिहिलं की, मुलीची जगण्याची इच्छाशक्ती खूप मजबूत आहे. दरम्यान तिनं रुग्णालयात उपचार घेत असताना एक गाणं लावण्याची परवानगी मागितली. यानंतर मी तिला परवागनी दिली. यावेळी संबंधित डॉक्टरांनी असंही सांगितलं होतं की, संबंधित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल. पण नुकतचं तिनं जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Dance video, Death

    पुढील बातम्या