मुंबई, 09 ऑगस्ट : एकिकडे जग कोरोनाव्हायरशी लढतं आहे. कोरोनापासून बचावासाठी स्वच्छतेची काळजी घेत आहेत. अशात परिस्थिती या महिलेने असा कारनामा (Weird act of woman) केला आहे की पाहूनच धक्का बसेल. या महिलेनं सुपरमार्केटमध्ये (Supermarket) घाणेरडं कृत्य केलं आहे. ज्याचाव्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दुकानात, सुपरमार्केटमध्ये शॉपिंग (Shopping) करायला गेलो की आपण सामान्यपणे हातांनी वस्तूंना स्पर्श करतो. पण ही महिला सुपरमार्केट जवळजवळ सर्वच वस्तू आपल्या जिभेने चाटते आहे (Woman licking everything in a shop). महिला शॉपिंग ट्रॉली, दरवाजाचं हँडल, प्लॅस्टिक बॅग अशा सर्व वस्तू चाटताना दिसते.
रँडम युट्यूब चॅनेलवर रेडिटवरील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अशा उघड्यावर वस्तू जिभेने चाटणं तिच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असा अजब दावा तिने केला आहे. हे वाचा - VIDEO: अंड्यामध्ये Fanta मिसळून बनवलं ऑमलेट; ही डिश नेमकी काय? व्हिडीओ शेअऱ करताना विचित्र कॅप्शनही दिलं आहे. “बॅक्टेरिया तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवणात, अस्थमा, अॅलर्जीपासून लढण्याची क्षमता देतात. पचनात मदत करतात. स्वतंत्र व्हा. कारण प्रेम भीतीच्याही वर आहे. एकंदरच या महिलेला म्हणायचं आहे तिचं हे किळसवाणं कृत्य तिच्या शरीरासाठी वरदान आहे” हे वाचा - बापरे! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO पण महिलेनं असं किळसवाणं कृत्य करण्यामागे जे अजब कारण दिलं आहे, जे लोकांच्या पचनी पडलेलं नाही. उलट ही महिला सं करून सुपरमार्केटमध्ये व्हायरस, बॅक्टेरिया पसरवण्याचंच काम करते आहे. रेडिटवर हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यावरच बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. सर्वांनी या महिलेवर संताप व्यक्त केला आहे.