Home /News /viral /

जिच्यासोबत रात्र घालवली ती...; Bra मुळे मोठा उलगडा, तरुणीचं सत्य समजताच तरुण शॉक

जिच्यासोबत रात्र घालवली ती...; Bra मुळे मोठा उलगडा, तरुणीचं सत्य समजताच तरुण शॉक

रात्री तरुणी तरुणाच्या घरी ब्रा विसरून गेली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणासमोर तिचं मोठं सत्य समोर आलं.

    लंडन, 02 फेब्रुवारी :  हल्ली डेटिंग कल्चर सामान्य झालं आहे. आपला लाइफ पार्टनर निवडण्यापूर्वी लोक एकमेकांना भेटतात, समजून घेतात आणि त्यानंतर आपलं नातं पुढे नेतात. एका तरुणीसोबत अशीच डेटिंग करणाऱ्या एका तरुणाने आपला अनुभव मांडला आहे. ज्या महिलेला तो डेट करत होता तिच्यासोबत त्याने एक रात्र घालवली. त्यानंतर तिच्या ब्रामुळे तिच्याबाबत मोठा उलगडा झाला. ब्रामुळे त्याला त्या तरुणीचं सत्य समजलं. तिचा खरा चेहरा त्याच्यासमोर आला आणि तेव्हा तो शॉकच झाला (Weird Dating Experience). मिररच्या रिपोर्टनुसार टिकटॉकर क्रिसने (Kris) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एका महिलेला डेट करत असल्याचं सांगितलं. त्या महिलेसोबत त्याने रात्र घालवली. ती महिला त्याचा घरी तिची ब्रा विसरून गेली आणि दुसऱ्या दिवशी तिने त्याला एक मेसेज केला. ज्यामुळे तिची पोलखोल झाली (Woman’s secret revealed in message). हे वाचा - Virtual world ही महिलांसाठी असुरक्षित! Metaverse मध्ये जाताच 60 सेकंदात गँगरेप क्रिसने सांगितलं मेसेजमध्ये ती म्हणाली, मी त्याच्या घरी माझी ब्रा ठेवली आहे. आता  हे सांगण्यासाठी त्याला मला कॉल करण्याशिवाय पर्याय नाही. मला वाटतं मी प्रेमात पडले आहे. तुझी रात्र कशी होती. महिलेचा हा मेसेज पाहून क्रिस हैराण झाला पण ती महिला आपल्यावर प्रेम करते हे समजताच त्याच्या आनंदालाही पारावर उरला नाही. त्यानेही त्या महिलेच्या मेसेजला रिप्लाय दिला. माझी रात्र खूप चांगली होती कराण मी ती तुझ्यासोबत घालवली. मला वाटतं तसा  हा मेसेज माझ्यासाठी नसावा. क्रिसने रिप्लाय देतात महिलेने लगेच मेसेज केला. अरे देवा. माझ्या या मेसेजकडे लक्ष देऊ नको. मला आता खूप लाज वाटते आहे. हे वाचा - बापरे! छातीऐवजी पाठ आली बाहेर; EXCERCISE चा झाला उलटा परिणाम क्रिसच्या मते महिलेने त्याला चुकून मेसेज पाठवला ज्यामुळे तिची पोलखोल झाली. पण नेटिझन्सने तिने मुद्दामहून ब्रा त्याच्या घरी ठेवल्याचं म्हटलं आहे. तिने चुकून नव्हे तर मुद्दामहून मेसेज केला होता. जेणेकरून ती क्रिसवर प्रेम करते हे त्याला समजावं. ही नियोजित चूक होती, असं इतर लोकांचं म्हणणं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral

    पुढील बातम्या