बेलफास्ट, 02 फेब्रुवारी : छाती ताणून चालायला कोणत्या पुरुषाला आवडणार नाही. ‘चौडी छाती’ हवी यासाठी बरेच पुरुष मेहनतही घेतात. जीममध्ये जाऊन विशिष्ट एक्सरसाइज करतात, त्यासाठी घाम गाळतात. पण जरा विचार करा इतकी मेहनत करून जर या एक्सरसाइझचा उलटा परिणाम झाला तर… एका व्यक्तीच्या बाबतीत असं घडलं आहे. एक्सरसाइझनंतर त्याच्या छातीऐवजी पाठच बाहेर आली (Chest Twice Big Than Waist). नॉर्थ आयर्लंडमधील (North Ireland) 26 वर्षांचा बॉडीबिल्डर एंड्रजेज टोमॉसकी (Andrzej Tomalski). याने अशी एक्सरसाइझ केली की त्याच्या शरीराची रचनाच पूर्णपणे बिघडली. 9 वर्षांपूर्वी त्याने जीममध्ये जाणं सुरू केलं. पण त्याला आपली बॉडी इतर बॉडीबिल्डरप्रमाणे नको होती. त्याला काहीतरी वेगळंच हवं होतं. असं काहीतरी वेगळं कऱण्याच्या नादात त्याने एक्सरसाइझही वेगळ्या पद्धतीने केली. म्हणजे त्याने चुकीची एक्सरसाइझ केली. त्यामुळे त्याच्या शरीराचा आकारच वेगळा झाला. हे वाचा - संशोधनातूनही झाला होता खुलासा; त्याच दिवशी या बॉलिवूड अभिनेत्यालाही हार्ट अटॅक दिवसरात्र तो एक्सरसाइझ करत होता. त्यानंतर शेवटी जो परिणाम दिसला तो पाहून त्याचं कुटुंबही शॉक झाले. त्याच्या छातीचा आकार कमरेच्या आकारच्या दुप्पटीपेक्षा जास्त झाला होता. त्याने आपल्या बॉडीचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. त्याने आपल्या जीम रूटिनबाबत सांगितलं, तो आपल्या शोल्डवर जास्त लक्ष देतो. जेव्हा त्याने एक्सरसाइझ सुरू केलं तेव्हा आपले शोल्डर सर्वात जास्त वाढत असल्याचं त्याने पाहिलं. तेव्हा त्याने आपली बॉ़डी व्ही आकारात बदलण्याचं ठरवलं. त्याने वर्कआऊटदरम्यान असे एक्सरसाइझ निवडले ज्यामुळे त्याची कमर छातीपेक्षा दुप्पट लहान झाली. हे वाचा - महिलेनं अचानक कमी केलं वजन; आता झाली अतिशय भयंकर अवस्था, पाहूनच व्हाल शॉक आता ही विचित्र बॉडीच त्याच्या कमाईचा मार्ग आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.