Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे? 67 वर्षे अंघोळ नाही, कपडे धुतले नाहीत, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही

कसं शक्य आहे? 67 वर्षे अंघोळ नाही, कपडे धुतले नाहीत, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही

फुटपाथवर राहून अस्वच्छतेत जीवन जगणाऱ्या 87 वर्षीय व्यक्तीचं आरोग्य पाहून तज्ज्ञही हैराण झाले आहेत.

    तेहरान, 20 जानेवारी : कोणताही आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण स्वच्छतेची खूप काळजी घेतो. दररोज अंघोळ करतो, स्वच्छ धुतलेले कपडे घालतो, स्वच्छ पाणी पितो, स्वच्छ पद्धतीने बनवलेले पदार्थ खातो, घर आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ होतो. इतकी काळजी घेऊनही आपल्याला काही ना काही आजार होतोच. पण एका व्यक्तीने मात्र गेली 67 वर्षे अंघोळ केली नाही (Man healthy without bathing for 67 years). इतकंच नव्हे तर कचरा खाऊन तो जगतो आहे, पण तरी त्याला एकही आजार झाला नाही. वयाच्या 87 मध्येही ही व्यक्ती एकदम ठणठणीत आहे . इराणमधील 87 वर्षांचे अमोउ हाजी (Amou Jaji) कित्येक वर्षे फुटपाथवर राहत आहेत. गेल्या 67 वर्षांपासून त्यांनी अंघोळ केली नाही. आपले कपडेही धुतले नाही. कचऱ्यात पडलेले खाद्यपदार्थ खाऊन ते आपलं पोट भरत आहे. अस्वच्छता यातच ते जगतात. पण तरी त्यांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम झाला नाही. अमोउ यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची पूर्ण स्कॅनिंग करण्यात आले आणि त्यांचं इतकं उत्तम आरोग्य पाहून तज्ज्ञही हैराण झाले आहेत. हे वाचा - रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षीय धडधाकट तरुणाचा अचानक जीव गेला अमोऊ हाजी सांगतात, "गावाबाहेर एका खड्ड्यात ते राहतात. आजूबाजूचे लोक त्यांना कधीतरी खायला देतात. नाहीतर ते रस्त्यावर, कचऱ्यात फेकलेले पदार्थ खातात. नाहीतर मृत, सडलेले जनावरांचं मांस खाऊन पोट भरतात. रस्त्याच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या पाण्यावरच ते आपली तहान भागवात. तरी ते निरोगी आहेत. अस्वच्छतेनेच त्यांना मजबूत बनवलं आहे."
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या