जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बॉयफ्रेंडने ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नाही दिले पैसे, भडकलेल्या महिलेनं अपहरण करून दिली भयंकर शिक्षा

बॉयफ्रेंडने ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नाही दिले पैसे, भडकलेल्या महिलेनं अपहरण करून दिली भयंकर शिक्षा

बॉयफ्रेंडने ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नाही दिले पैसे, भडकलेल्या महिलेनं अपहरण करून दिली भयंकर शिक्षा

सराह डेवीज नावाच्या 33 वर्षीय महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला 12 तास किडनॅप करून ठेवलं आणि त्याला अजब पद्धतीने टॉर्चर केलं. सराह हिची इच्छा होती की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या लिप बोटॉक्ससाठी पैसे द्यावे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 फेब्रुवारी: अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी निरनिराळ्या ब्यूटी ट्रीटमेंट (Beauty Treatment) घेतात. मात्र एखाद्या तरुणीने आपल्या पार्टनरला फक्त यासाठी टॉर्चर केलं, कारण तो तिच्या महागड्या ट्रीटमेंटसाठी पैसे देत नाही, तर ही नक्कीच हैराण करणारी बाब आहे. एका ब्रिटीश महिलेनं असंच केलं. ज्याबद्दल जाणूनच तुम्ही थक्क व्हाल. सराह डेवीज नावाच्या 33 वर्षीय महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला 12 तास किडनॅप करून ठेवलं आणि त्याला अजब पद्धतीने टॉर्चर केलं. सॅलफोर्डची रहिवासी असलेल्या सराह हिची इच्छा होती की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या लिप बोटॉक्ससाठी पैसे द्यावे. जेव्हा बॉयफ्रेंडने असं केलं नाही, तेव्हा भडकलेल्या महिलेनं असं काही केलं ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती (Woman Kidnap and Tortured her Boyfriend for Money). एका वर्षात ओढायचा 6 लाख सिगारेट; 20 वर्षांनी सवय सोडताच दिसला हा मोठा परिणाम 3 मुलांची आई असलेल्या सराहचं मार्क केनेडी नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर होतं. सुरक्षारक्षकाची नोकरी करणाऱ्या सराहने लिप बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली. यासाठी तिला आपल्या बॉयफ्रेंडकडून पैसे हवे होते. मात्र केनेडीने पैसे न दिल्याने सराहने एक भयंकर प्लॅन बनवला.

News18

महिलीने केनेडीवर आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला, यानंतर तिने त्याला किडनॅप करून गुन्हा कबूल करायला लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने केनेडीला १२ तास किडनॅप करून ठेवलं. टॉर्चर करण्यासाठी त्याच्या डोक्यावर गरम पाणी ओतलं आणि हातावरही सिगारेटचे चटके दिले. महिलेसोबत तिचा एक मित्रही होता.

बसचालकाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्याचा जीव घेतला, थरकाप उडविणारा VIDEO समोर

आरोपींनी त्या व्यक्तीच्या आईकडे दहा लाखांची मागणीही केली. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित व्यक्तीने सांगितलं की महिलेनं आपल्या मित्रासोबत मिळून त्याचं अपहरण केलं आणि नंतर त्याला टॉर्चर केलं. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर न्यायालयाने केनेडीवरील आरोप खोटे असल्याचं सांगत त्याचं अपहरण करणाऱ्या स्टीवेनला 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीडित केनेडी आणि सराह यांची ङेट मागील वर्षी फेसबुकवर झाली होती, तेव्हापासून ते सोबत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात