जाहिरात
मराठी बातम्या / Viral / World record साठी खतरनाक स्टंट! High heels घालून दोरीवर चढली महिला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

World record साठी खतरनाक स्टंट! High heels घालून दोरीवर चढली महिला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

World record साठी खतरनाक स्टंट! High heels घालून दोरीवर चढली महिला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

हाय हिल्स घालून उंचावर बांधलेल्या दोरीवर चढली महिला आणि केला खरतनाक स्टंट.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी : हातात काठी घेऊन उंच बांधलेल्या दोरीवरून चालण्याचा डोंबाऱ्याचा खेळ किंवा सर्कशीत दोरीवरील चित्तथरारक कसरती तुम्ही पाहिल्याच असतील. पण एका महिलेने हे धाडस चक्क हाय हिल्स घालून केलं आहे. म्हणजे हाय हिल्स घालून ही महिला अशा उंचावर असलेल्या दोरीवर चढली आणि तिने खतरनाक स्टंट केला आहे (Woman stunt on rope with high heels). डोंबारीचा खेळ पाहताना दोरीवरून चालणारी मुलगी पाहिली तरी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. विचार केला या अशा दोरीवरून एखादी महिला हाय हिल्स घालून चढली तर काय होईल? या महिलेने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. हाय हिल्स घालून ती दोरीवर चढलीच पण सोबतच तिने असं काही केलं की पाहून आपल्याला धडकी भरते. ओल्गा हेनरी असं या महिलेचं नाव आहे. आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. या महिलेनेही प्रसिद्धीसाठी आणि विश्वविक्रम आपल्या नावे करण्यासाठी म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डसाठी खतरनाक स्टंट केला आहे. हे वाचा -  OMG! प्रेग्नंट महिलेने खांद्यावर उचललं वजन आणि… VIDEO पाहून नेटिझन्स शॉक व्हिडीओत पाहू शकता या महिलेने आपल्या पायात हाय हिल्स किंबहुना पेन्सिल हिल्स घातले आहे. अशा हिल्सनी जमिनीवर चालणंही अशक्य होतं, सर्वांना असे हिल्स घालून चालता येत नाही. चालता चालता पाय मुरगळण्याचाही धोका असतो. असं असताना ओल्गा मात्र असे हिल्स घालून दोरीवर चढली. त्यानंतर ती दोरीवरून उडी मारते आणि त्यावर बसते. पुन्हा उडी मारून ती दोरीवर उभी राहते. असंच करत करत ती दोरीवर पुढे येताना दिसता.

जाहिरात

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सांता मोनिका बीचवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. चेहऱ्यावर हास्य ठेऊन ती सॅकलाइन अगदी सहजपणे बम्प बाऊन्स करते आहे, धडकी भरवणाऱ्या या स्टंटची मजा लुटते आहे. हे वाचा -  Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी हाय हिल्स घालून दोरीवर असं थरारक करतब दाखवणाऱ्या या महिलेची गिनीज बुकनेही  नोंद घेतली आहे.  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness W****orld Records) अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कमीत कमी वेळेत हाय हिल्स घालून सॅकलाइनवर बम्प बाऊन्स करण्याचा तिने विक्रम केला आहे. ओल्गाने सॅकलाइनवर अशा पद्धतीने 1 मिनिटात 25 वेळा बम्प बाऊन्स करण्याचा रेकॉर्ड केला आहे. जे सहजासहजी कुणाला शक्य नाही.  हा स्टंट पाहून बरेच लोक हैराण झाले आहेत, हे करतब करणाऱ्या ओल्गाचं त्यांनी कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात