जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी

Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी

Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी

ना घाबरला, ना मागे हटला एवढ्याशा पक्ष्याने धाडसाने केला बैलांच्या कळपाचा सामना.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी : चवताळलेल्या बैलासमोर उभं राहण्याची हिंमत साधा माणूसही करणार नाही. अशा बैलांच्या कळपाशी चक्क एका पक्ष्याने झुंज दिली आहे (Oxen bird fight). भल्यामोठ्या बैलांशी छोट्याशा पक्ष्याने पंगा घेतला (Bird fight with oxen). शॉकिंग म्हणजे या बैलांच्या कळपावर हा एकटा पक्षी भारी पडला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. बैल आणि पक्षी दोघांच्या ताकदीची कल्पना तुम्हाला आहे. हे दोघं आमनेसामने आले तर कोण जिंकेल याचा अंदाजा आपण लावूच शकतो. पण इथं मात्र याचं उलटं घडलं आहे. एकट्या पक्ष्याशी लढता लढता या बैलांना चांगलाच घाम फुटला. अखेर बैलांनाच हार मानून त्या पक्ष्यापासून दूर पळण्याची वेळ आली. हे वाचा -  भडकलेल्या रेड्याच्या समोर आला सायकलस्वार; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप,VIDEO व्हिडीओत पाहू शकता बऱ्याच बैलांनी एकट्या पक्ष्याला घेरलं आहे. आता सामान्यपणे दुसरं कुणी असतं तर त्याने इथून पळ काढला असता. पण हा पक्षी इतका धाडसी आहे की मागे न पळता थेट बैलाच्या समोर गेला. एका बैलाने त्या पक्ष्याला आपल्या डोक्याने टक्करही दिली, पण तरी पक्षी काही जागचा हलला नाही. त्यानंतर दुसरा आणखी एक बैलही त्याच्यावर हल्ला करतो, तेव्हाही पक्षी मागे हटत नाही.

जाहिरात

ज्या पक्ष्याला बैलांनी एवढंसं समजून त्याच्यावर हल्ला केला, त्याच्या ताकदीचा अंदाज त्यांनाही आला. सर्वजण त्या पक्ष्यापासून दूर पळाले. पक्ष्याच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. हे वाचा -  आकाशात झेप घेत गरुडांचा मनमोहक डान्स; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं बिझनेसमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ‘How’s the Josh, bird?’ ‘High sir, Ultra high’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा प्रेरणादायी व्हिडीओ बरंच काही सांगून, शिकवून जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात