Home /News /viral /

OMG! Pregnant महिलेने जीममध्ये खांद्यावर घेतलं वजन आणि...; Excercise Video पाहून नेटिझन्स शॉक

OMG! Pregnant महिलेने जीममध्ये खांद्यावर घेतलं वजन आणि...; Excercise Video पाहून नेटिझन्स शॉक

प्रेग्नन्सीत जे न करण्याचा सल्ला दिला जातो तेच या महिलेने केलं, जे पाहून सर्वांना घाम फुटला.

  मुंबई, 23 फेब्रुवारी : प्रेग्न्सीच्या कालावधीत महिलांना आपली खूप काळजी घ्यावी लागते. त्यापैकी एक म्हणजे जास्त वजन न उचलणं. असं असताना एक महिला मात्र प्रेग्न्सीच्या कालावधीत जीममध्ये अशी एक्सरसाइझ केली आहे (Pregnant Woman Exercise Video), जे पाहूनच इतरांना मात्र घाम फुटला आहे. या महिलेने बेबी बम्प असताना आपल्या खांद्यावर बिनधास्तपणे इतकं वजन उचललं आहे, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Pregnant weight lifting video). प्रेग्नन्सीत योगा, व्यायाम, एक्सरसाइझ महत्त्वाचं असतं (Pregnancy Workout). प्रेग्नंट महिलांसाठी काही खास एक्सरसाइझ असतात. पण ही महिला मात्र ती एरवी जशी एक्सरसाइझ तशीच एक्सरसाइझ करताना दिसली. म्हणजे जी गोष्ट शक्यतो महिलांना प्रेग्नंट असताना न करण्याचा सल्ला दिला जातो किंवा ते करण्यास महिला घाबरतात नेमकं तेच या महिलेनं केलं आहे (Exercise During Pregnancy). surprizhikayeler नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - वधूला मित्रांनी दिली रडण्याची ट्रेनिंग, अश्रूऐवजी काढले दात; Funny Video व्हिडीओत पाहू शकता एक महिला जी प्रेग्नंट आहे, तिचं बेबी बम्पही दिसतं आहे. ती जीममध्ये एक्सरसाइझ करायला आली आहे. आता तिने साध्या एक्सरसाइझ करणं अपेक्षित होतं. पण ती हेवी एक्सरसाइझ करताना दिसली. महिला अशा अवस्थेतही वेट लिफ्टिंग करत स्क्वॅट करते आहे. ज्याला वेट स्क्वॅट म्हटलं जातं.
  तिच्या खांद्यावर जवळपास 30 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन असावं. हे वजन खांद्यावर उचलताना तिने कुणाची मदतही घेतली नाही आहे. इतकं वजन खांद्यावर घेत ती एकटीच एक्सरसाइझ करते आहे. खांद्यावर इतका भार घेऊन ती स्क्वॅट करते आहे. वेट स्क्वॅटसाठी शरीर खूप मजबूत असणं आवश्यक आहे. या महिलेचं बेबी बम्प पाबहता ती सहा-सात महिन्यांची प्रेग्नंट असावी असं वाटतं. पण तरी ती इतकी भारी एक्सरसाइझ करते आहे. हे वाचा - Video : अरे आवरा याला! बाईक चालवताना दोन्ही हातात मोबाइल; पोलीसही हैराण व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स शॉक झाले आहेत. काही लोकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी असा व्यायाम प्रेग्नन्सीत चांगला नसल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही मात्र असं काही करू नका. प्रेग्नन्सीत कोणतीही एक्सरसाइझ करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ल जरूर घ्या. या महिलेनेही डॉक्टरांचा सल्ला घेतला असावा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Fitness, Pregnancy, Pregnant, Pregnant woman, Viral, Viral videos

  पुढील बातम्या