नवी दिल्ली 23 एप्रिल : कोणतंही नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. या दोन्ही गोष्टी त्याच्यातून नाहीशा झाल्या तर नातं टिकत नाही. अशा परिस्थितीत जर एका जोडीदाराने दुसऱ्याची फसवणूक केली तर तो विश्वासघात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास बनतो. यानंतर बरेच लोक फसवणूकीचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत राहातात. हे लोक आपल्या पार्टनरचा बदला घेण्यासाठी असा मार्ग अवलंबतात, जो पाहून सगळेच श़ॉक होतात. नुकतंच एका तरुणीनेही असंच काहीसं केलं (Woman took revenge from cheating boyfriend) . कॉलेजच्या अभ्यासक्रमात चक्क ‘हार्डकोअर पॉर्नोग्राफी’; विद्यार्थी एकत्र बसून पाहणार अश्लील फिल्म्स डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, TikTok यूजर @sararhiannon88 ने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या धोका देणाऱ्या प्रियकराची चोरी कशी पकडली हे सांगितलं होतं. तिने आपल्या प्रियकराचं सत्य सर्वांसमोर आणलं. हा व्हिडिओ पाहून लोकांनीही महिलेच्या डोक्याचं आणि बदला घेण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की महिलेनं असं नेमकं काय केलं. तर, तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, तिने तिच्या प्रियकराला डिनरसाठी आमंत्रित केलं आणि भेटवस्तू दिली (Woman Gave Weird Gift to Boyfriend). तिने एक तपकिरी रंगाचे पॅकेट तिच्या प्रियकराकडे दिलं, याच्या आत नेमकं काय आहे, हे पाहण्यासाठी तिचा प्रियकर अतिशय उत्सुक होता. यानंतर त्याने पाकीट उघडून आत ठेवलेला कागद पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. या पॅकेटच्या आत अनेक पेपर होते, ज्यावर त्याच्या व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रीनशॉट होते, ज्यात तो दुसऱ्या मुलीशी बोलत होता. त्याचं अफेअर असल्याचं त्या मेसेजवरून कळत होतं. भंगार झालेल्या बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी! महिलेनं सांगितलं की, ज्या मुलीसोबत त्याचं अफेअर होतं, तिने त्याला व्हिडिओ कॉलही केला होता आणि महिलेचा जिवलग मित्र संपूर्ण सीन रेकॉर्ड करत होता. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत 28 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी या महिलेचं भरपूर कौतुक केलं. महिलेनं आपल्या प्रियकरासोबतचे सगळे संबंध तोडले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







