या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुण कशा पद्धतीनं सिंहाला खेटून सेल्फी काढत आहे. सिंहानं त्याच्यावर हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडला असता.सिंहासोबत सेल्फी काढणं किंवा असे टिकटॉक व्हिडीओ तयार करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. विना परवानगी सिंहासोबत फोटो काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. गीर सोमनाथ इथे अशा पद्धतीनं व्हिडीओ काढण्यास किंवा सेल्फी काढण्यासाठी मनाई असताना तरुणानं केलेल्या हा धाडसामुळे खळबळ उडाली आहे. या आधीदेखील या तरुणानं सिंहासोबत असे व्हिडीओ तयार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. हे वाचा-अबब! भलामोठा अजगर झाला शिकार, 15 फूट लांब किंग कोब्रानं बघताच क्षणी गिळलंवाघासोबत टिकटॉक व्हिडीओ तयार करणं पडलं महागात... pic.twitter.com/F2a8abiSbO
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) May 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Somnath, Viral video.