मराठी बातम्या /बातम्या /Viral /लायसन्स मिळवण्यासाठी महिलेनं 960 वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट; 11 लाख खर्च केले अन् शेवटी म्हातारपणी..

लायसन्स मिळवण्यासाठी महिलेनं 960 वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट; 11 लाख खर्च केले अन् शेवटी म्हातारपणी..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

चा सा सूनने एप्रिल 2005 मध्ये पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्टसाठी लेखी परीक्षा दिली होती. यात नापास झाल्यानंतर तिने पुन्हा ७८० वेळा परीक्षा दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 27 मार्च : आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचं काम जर तुम्हाला लांबलचक आणि कंटाळवाणं वाटत असेल, तर तुम्ही एका महिलेची गोष्ट ऐकलीच पाहिजे. जिला DL मिळवायला अनेक वर्षे लागली. तिला इतकी वाट पहावी लागली आणि 960 टेस्ट द्याव्या लागल्या, तेव्हा जाऊन अखेर तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकलं. तुम्ही पण विचार करत असाल की असं का झालं असेल?

लपून तिसरं लग्न करत होता व्यक्ती; इतक्यात पहिल्या पत्नीची मंडपात एन्ट्री अन् हाय व्होलटेज ड्रामा..VIDEO

हे प्रकरण दक्षिण कोरियाचं आहे, जिथे चा सा सून नावाची महिला राजधानी सेऊलपासून 130 मैलांवर राहते. या महिलेचा संयम आणि हार न मानण्याची तिची क्षमता जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण एखादे काम 8-10 वेळा करून सोडून देतो, पण या महिलेने सलग तीन वर्षे दर आठवड्याला 5 वेळा ड्रायव्हिंग टेस्ट देणं सुरू ठेवलं. इतकी वाट पाहिल्यानंतर आणि एवढी मेहनत केल्यावर अखेर तिला डीएल मिळू शकलं.

मिररच्या रिपोर्टनुसार, चा सा सूनने एप्रिल 2005 मध्ये पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्टसाठी लेखी परीक्षा दिली होती. यात नापास झाल्यानंतर तिने पुन्हा ७८० वेळा परीक्षा दिली. ती पास होईपर्यंत आठवड्यातून दोनदा तिच्या परीक्षा होत असत. त्यानंतर प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल टेस्ट सुरू झाली. यात उत्तीर्ण होण्यासाठी तिला आणखी 10 प्रयत्न करावे लागले. म्हणजेच एकूण 960 वेळा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चा सा सूनला तिच्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकलं. आता ती ६९ वर्षांची आहे.

इतकेच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेत महिलेनं £11,000 पेक्षा जास्त म्हणजेच 11 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला, तेव्हा तिला परवाना मिळू शकला. भाजीविक्रीच्या व्यवसायासाठी तिला या लायसन्सची गरज होती, जेणेकरून ती लॉरी चालवू शकेल. तिची कहाणी व्हायरल झाल्यानंतर तिला दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाईच्या निर्मात्याने एक नवीन वाहनदेखील दिलं आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. एवढंच नाही तर वाहनाच्या जाहिरातीतही तिला दाखवलं जाणार आहे. महिलेला लायसन मिळाल्यानंतर तिचा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर सर्वाधिक खूश आहे.

First published:
top videos

    Tags: Driving license, Viral news