मराठी बातम्या /बातम्या /Viral /लपून तिसरं लग्न करत होता व्यक्ती; इतक्यात पहिल्या पत्नीची मंडपात एन्ट्री अन् हाय व्होलटेज ड्रामा..VIDEO

लपून तिसरं लग्न करत होता व्यक्ती; इतक्यात पहिल्या पत्नीची मंडपात एन्ट्री अन् हाय व्होलटेज ड्रामा..VIDEO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, महिलेनं येऊन गोंधळ घातला, यानंतर ती वराला घटनास्थळावरून दुसऱ्या खोलीत नेताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 27 मार्च : एका महिलेनं पतीला तिसरं लग्न करताना पकडल्यानंतर लग्नाच्या मंडपात हाय-व्होल्टेज ड्रामा झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला आपल्या मुलासोबत लग्नाच्या मंडपात पोहोचते. ती वराला म्हणजेच तिच्या नवऱ्याला बोलावून कार्यक्रमस्थळी गोंधळ घालते. व्हिडिओमध्ये ती महिला म्हणतेय, “तो माझा पती आणि माझ्या मुलाचा बाप आहे. त्याने (पतीने) सांगितलं की तो तीन दिवसांसाठी हैदराबादला जाणार आहे आणि इथे तो लग्न करत आहे.

बोंबला! गर्लफ्रेंडच्या जॉब इंटरव्ह्यूमुळे बॉयफ्रेंड तुरुंगात; पोलिसांनी केली अटक कारण...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, महिलेनं येऊन गोंधळ घातला, यानंतर ती वराला घटनास्थळावरून दुसऱ्या खोलीत नेताना दिसत आहे. महिला लग्नाच्या ठिकाणी गोंधळ घालत असताना तिथे उपस्थित असलेले पाहुणे तिला दुसऱ्या खोलीत घेऊन जातात. महिलेच्या अशा दाव्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले अनेकजण थक्क झाले आणि लोक आश्चर्याने इकडेतिकडे बघत होते. तिने आपल्या दाव्यावर ठाम राहून सांगितलं की तिने 10 ऑक्टोबर 2014 रोजी त्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं.

याशिवाय, तिने असाही दावा केला की त्या व्यक्तीने दुसरं लग्नही केलं होतं आणि तिसर्‍या लग्नाची माहिती दुसऱ्या पत्नीला दिली होती. प्रकृती ठीक नसल्याने ती येऊ शकली नाही. शिवाय, ती पुढे म्हणाली, "आता तो पुन्हा लग्न करत आहे." महिलेनं घटनास्थळी उपस्थित असलेल्या पतीच्या कुटुंबावरही आरोप केले. काही वेळाने नवरदेव बटण उघडे असलेला शर्ट आणि पिवळ्या लुंगीमध्ये दिसतो. असं दिसतं की, त्याला पाहुणे आणि वधूच्या कुटुंबाने फसवणूक केल्याबद्दल जोरदार मारहाण केली आहे.

घर के कलेश नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला आहे. जो आतापर्यंत 200 हून अधिक रिट्विट्ससह 73 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral videos, Wife and husband