नवी दिल्ली 23 मार्च : एक महिला 6 फुटांचा विषारी साप तिच्या पलंगावर लपून बसलेला पाहून थक्क झाली. ही घटना सोमवारी घडली, जेव्हा ही महिला बेडशीट बदलण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेली. तेव्हा तिला तिच्या ब्लँकेटखाली एक अत्यंत विषारी पूर्व तपकिरी साप आढळला. तिने पटकन दरवाजा बंद केला. साप घरातून पळून जाऊ नये, यासाठी दरवाजाच्या खालील रिकाम्या जागेत टॉवेल ठेवून साप पकडणाऱ्याला माहिती देण्यात आली. ही घटना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये घडली.
अजगराचं फुगलेलं पोट पाहून गावकऱ्यांनी कापायचा घेतला निर्णय आणि...
साप पकडणारे झॅकॅरिस रिचर्ड्स म्हणाले, 'मी पोहोचलो तेव्हा ती महिला बाहेर माझी वाट पाहत होती, मी आत बेडरूममध्ये गेलो जिथे साप होता. साप बाहेर पडू नये म्हणून महिलेने दरवाजाखाली टॉवेल ठेवला होता. मी ढकलून दरवाजा उघडला तर साप बेडवर पडलेला होता आणि माझ्याकडे बघत होता. हा साप 6 फूट लांब होता.' झॅकॅरिसने फेसबुकवर सापाची छायाचित्रे पोस्ट केली.
रिचर्ड्स म्हणाले की, साप उष्णतेपासून बचावासाठी उघड्या दारातून आत शिरला असावा, कारण त्या दिवशी बाहेर खूप उष्णता होती. किंवा झोपण्यासाठी त्याला आरामदायी पलंगाची गरज होती. पकडल्यानंतर त्यांनी सापाला जवळच्या झुडपात सोडलं. साप पकडणाऱ्याने इतरांनाही महिलेप्रमाणे स्वतःचा जीव वाचण्याचा सल्ला दिला.
ईस्टर्न तपकिरी साप हा ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी लँड स्नेक आहे. मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या ऑस्ट्रेलियन व्हेनम रिसर्च युनिटच्या आकडेवारीनुसार, जगभरात आढळणाऱ्या सापांमध्ये हा दुसरा सर्वात विषारी साप आहे. त्याच्या विषामध्ये एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन असतं, जे हळूहळू पीडित व्यक्तीचं हृदय, फुफ्फुस आणि डायाफ्राममधील मज्जातंतूंना अर्धांगवायू करतं आणि शेवटी गुदमरल्यासारखं होतं. क्वीन्सलँडमधील पर्यावरण आणि विज्ञान विभागाच्या मते, ही प्रजाती दिवसा सर्वात जास्त सक्रिय असते आणि भडकल्यावर चावू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Snake