मुंबई : प्राण्यांचं आयुष्य एकमेकांवर अवलंबून असतं. ते त्यांचं पोट भरण्यासाठी एकमेकांना खात असतात. त्यांची अन्न साखळीच अशी असते की त्यांना आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्याची शिकार करावी लागते. पण कधीकधी हे दृश्य माणसांसाठी पाहण्यासाठी विचित्र वाटतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल.
हा प्रकार ऍमेझॉनच्या जंगलातील सॅंटो अँटोनियोमध्ये घडला. येथील नागरिकांना एक अजगर दिसला, ज्याचे पोट खूप फुगले होते. अशा स्थितीत गावकऱ्यांनी फारशी वाट न पाहता त्या अजगराचे पोट फाडण्याचा निश्चय केला. काहींनी या घटनेची माहिती वनविभागाला माहिती देण्यास सांगितले, मात्र गावकऱ्यांनीच काही ऐकले नाही आणि अजगराचे पोट फाडले.
वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video
ही घटना 18 मार्च रोजी घडली, गावातील रहिवाशांना Boa constrictor प्रजातीचा एक महाकाय अजगर दिसला. त्याचे पोट फुगलेले दिसत होते, अशा प्रकारे गावकऱ्यांना समजले होते की त्याने काही शिकार केली आहे.
या परिसरातून एका शेतकऱ्याच्या काही मेंढ्याही बेपत्ता असल्याची माहिती मिळताच त्यांनी अजगराचे पोट कापून मेंढ्या वाचवण्याचा निर्णय घेतला.
यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये गावकरी निर्दयीपणे अजगराला मारत आहेत. एक व्यक्ती त्याच्या मानेवर उभा आहे, तर दुसरी व्यक्ती चाकूने पोट कापत आहे. त्यांनी अजगराच्या पोटातून मेंढी बाहेर काढल्या, पण त्या मेलेल्या होत्या. साधारणपणे अजगराला शिकार पचायला ५ दिवस लागतात आणि त्याने मेंढ्या ताज्या गिळल्या होत्या. तरीही त्यांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python, Shocking, Social media, Top trending, Viral