नवी दिल्ली 12 ऑगस्ट : जगभरातून प्रेग्नेंसीबाबत अनेक अजब (Weird Pregnancy) घटना समोर येताना पाहायला मिळतात. अनेक महिला असा दावा करतात, की शारीरिक संबंध न ठेवताच त्या गरोदर राहिल्या (Woman Pregnant Without Sex) आहेत. तर, काही महिला असाही दावा करतात की बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांना आपण गरोदर होतो, हे समजलं. आता सोशल मीडियावर असंच एक प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. यात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका महिलेनं दावा केला आहे, की सँडविच खाल्ल्यानंतर ती गरोदर झाली (Woman Gets Pregnant After Eating Sandwich) . या महिलेनं लिहिलं, की सँडविचनं तिला पाच महिन्यांची गर्भवती केलं. पुढची घटना तर आणखीच मजेशीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील (California) जॅस्मिन मिलेर (Jasmine Miller) हिनं आपलं आवडतं सँडविच ऑर्डर केलं होतं. हे सँडविच खाल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आईनं तिच्याकडे पाहून म्हटलं, की तुझं पोट फार मोठं आणि बाहेर आल्यासारखं दिसत आहे. सँडविच खाल्ल्यामुळे असं झालं असावं असं त्यांनी गृहीत धरलं. मात्र, जॅस्मिननं मस्करीत हसत असं म्हटलं, की सँडविच खाल्ल्यानं ती गरोदर राहिली आहे आणि प्रेग्नेंसी किट घेऊन ती आपली टेस्ट करू लागली. पण टेस्ट केल्यानंतर जॅस्मिन आणि तिची आई दोघीही हैराण झाल्या.
असा चालक होणे नाही! ड्रायव्हिंगचा हा जबरदस्त VIDEO पाहून येईल अंगावर काटा
सँडविच खाल्ल्यामुळे पोट फुगल्याचं पाहून मस्करीत जॅस्मिननं प्रेग्नेंसी टेस्ट केली, मात्र यात ती खरंच गरोदर असल्याचं समोर आलं. 24 वर्षाच्या जॅस्मिनला याआधी आपल्या प्रेग्नेंसीबाबत काहीही कल्पना नव्हती. सँडविच खाऊन घरी आल्यावर तिच्या पोटावर तिच्या आईची नजर गेली. मात्र, आईनंही तिला गर्भवती असल्याचं म्हणत, मस्करी केली होती. मात्र, ही मस्करी खरी निघाली. टेस्ट रिझल्ट पाहताच जॅस्मिनची अवस्था वाईट झाली. ती पाच महिन्यांची गर्भवती होती.
जॅस्मिन पाच महिन्यांची गर्भवती होती, मात्र याबाबत काहीही तिला समजलं नाही. याचं कारण होतं, ती घेत असलेल्या बर्थ कंट्रोल पिल्स. बऱ्याच काळापासून ती बर्थ कंट्रोल पिल्स घेत होती. यामुळे तिला पीरियड्स येत नव्हते. जॅस्मिननं सांगितलं, की तिला एक बॉयफ्रेंड आहे, मात्र त्या दोघांनी कुटुंबाबाबत काहीही प्लॅनिंग केलेलं नाही. मात्र, अचानक मिळालेल्या या बातमीमुळे दोघांनाही धक्का बसला. परंतु नंतर दोघांनीही हे एक्सेप्ट केलं आणि आता ते आपली मुलगी लाइटोन हिच्यासोबत राहतात.
नावेत बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न भोवला; दुचाकीसह नदीत कोसळला युवक, पाहा VIDEO
जॅस्मिनला पाच महिन्यांनंतर तिच्या गरोदरपणाबद्दल समजलं होतं. यामुळे ती गर्भपात करू शकत नव्हती. त्यामुळे, या टेस्टनंतर जॅस्मिन आणि तिच्या आईनं प्रेग्नेंसीबाबतचे प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केली. यानंतर दोन महिन्यातच बाळाचा जन्म झाला. प्री मॅच्युअर असल्यानं बाळाला बरेच दिवस आयसीयूमध्ये ठेवलं गेलं. आता जॅस्मिन आपल्या मुलीसोबत आईच्या घरी आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girl pregnant, Pregnancy, Viral news