नवी दिल्ली 26 एप्रिल : जे लोक आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी पाळतात, त्यांना या प्राण्यांपासून वेगळं होण्याच्या विचारानेही भीती वाटते. काही लोक असेही असतात जे आपल्या पाळीव प्राण्यांसोबत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असंच काहीसं डेबोरा हॉज नावाच्या महिलेनं केलं आहे. तिने थेट आपल्या पाळीव मांजरीशीच लग्न केलं आहे (Woman get Married with Pet Cat). बापरे! असं काय घडलं की नवरदेव-नवरीने मंडपातच एकमेकांना धू-धू धुतलं; हा Video पाहून व्हाल शॉक 49 वर्षीय डेबोरा हॉजने एका पार्कमध्ये समारंभ आयोजित करून तिच्या इंडिया नावाच्या मांजरीशी लग्न केलं. महिलेची अडचण अशी होती की तिच्या घराचे मालक अनेकदा तिला पाळीव प्राणी आपल्यासोबत ठेवण्यास मनाई करत होते. त्यावर उपाय म्हणून महिलेनं तिच्या पाळीव मांजरीशीच लग्न केलं. सिंगल मदर डेबोराने एका पार्कमध्ये लग्नसोहळा आयोजित केला होता. तिने स्वतः टक्सिडो सूट घातला होता आणि गोल्ड लेम मांजरीसह तिने सोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली. द सनच्या वृत्तानुसार, डेबोराचा दावा आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून तिचे घरमालक तिला 2 कुत्रे आणि एका मांजरीमुळे घरात राहू देत नव्हते. तिला वारंवार घरं बदलावी लागत होती. डेबोरा सांगते की ती तिच्या कॅट इंडियाशिवाय जगू शकत नाही. ती आपल्या मुलांनंतर या मांजरीला आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मानते. यामुळे तिला आपल्या मांजरीपासून दूर जाण्याची भीती सतावत होती. अशात तिने मांजरीसोबत लग्न करून पती-पत्नी बनण्याचा निर्णय घेतला. अतिउत्साह पडला महागात! लग्नाच्या पहिल्या रात्रीच रुग्णलयात पोहोचली नवरीबाई डेबोराने एका सिव्हल सेरेमनीमध्ये लग्न केलं, ज्यामध्ये तिचे मित्र-मैत्रिणीही उपस्थित होते. त्यांना हे सगळं विचित्र वाटलं पण सगळ्यांना मजा आली. मात्र त्यांनी आपल्या मुलांना या उत्सवात सहभागी केलं नाही कारण त्यांना ते योग्य वाटलं नाही. कॅट 2017 पासून डेबोरासोबत राहत आहे. ही महिला आणि मांजर यांचं नाते असं आहे की ती त्याला क्षणभरही सोडू इच्छित नाही. या खास नात्याचं त्यांनी लग्नाच्या बंधनात रूपांतर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.