यानंतर जे काही घडतं, त्याचा तिथे उपस्थित कोणी विचारही केला नसेल. नवरी रागात नवरदेवाच्या चेहऱ्यावर मिठाई फासते. हे पाहून नवरदेव भडकतो आणि तो नवरीच्या कानशिलात लगावतो. याच्या उत्तरात नवरीही नवरदेवाला चापट मारताना दिसते. यानंतर नवरी आणि नवरदेव अगदी जोरजोरात एकमेकांना चापट मारू लागतात. नवरदेवाने 'कुबूल है' म्हणताच नवरीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की वेडिंग हॉलमध्ये पिकला हशा, Video हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक असंही म्हणू लागले आहेत की नवरी-नवरदेवाच्या भांडणाचा हा व्हिडिओ खोटा असून त्यात ते अॅक्टिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण कुठलं आहे किंवा या व्हिडिओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत. इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड होताच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आजच मारून टाकशील का?'. या व्हिडिओवर यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.